'हॉट' सनी लिओनीच्या जीवनावर येणार चित्रपट
By Admin | Updated: July 27, 2016 12:05 IST2016-07-27T12:05:46+5:302016-07-27T12:05:46+5:30
बॉलिवूडची बोल्ड, हॉट अभिनेत्री सनी लिओनीच्या जीवनावर लवकरच चित्रपट येणार आहे. या चित्रपटात सनीचा पॉर्न स्टार ते बॉलिवूडमधला प्रवास दाखवण्यात येणार आहे.

'हॉट' सनी लिओनीच्या जीवनावर येणार चित्रपट
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - बॉलिवूडची बोल्ड, हॉट अभिनेत्री सनी लिओनीच्या जीवनावर लवकरच चित्रपट येणार आहे. या चित्रपटात सनीचा पॉर्न स्टार ते बॉलिवूडमधला प्रवास दाखवण्यात येणार आहे. सनीला तिच्या करीयरमध्ये साथ देणारा तिचा पती डॅनियल वेबर बरोबरचे नातेही या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे. पॉर्न चित्रपट तिला का स्वीकारावे लागले, बॉलिवूडमध्ये कसा प्रवेश झाला या सर्व घटना चित्रपटातून मांडण्यात येणार आहेत.
तेरे बिन लादेन या लोकप्रिय चित्रपटाचा दिग्दर्शक अभिषेक वर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. स्वत: सनी या चित्रपटात तिची व्यक्तीरेखा साकारणार आहे. सनीच्या आयुष्यावरील येणारा हा एकमेव चित्रपट नाही. यापूर्वी कॅनडाचे पत्रकार दिलीप मेहता यांनी एक डॉक्युमेंट्री बनवली होती. या डॉक्युमेंट्रीतील बहुतांश भाग सनीशी संबंधित होता.
सनडान्स फेस्टीव्हल २०१६ मध्ये ही डॉक्युमेंट्री दाखवण्यात आली होती. सनीचा पती डॅनियल स्वत: या चित्रपटात भूमिका करणार आहे. सनी आणि डॅनियल दोघे या चित्रपटाचे निर्माते असून, २०१६ च्या अखेरीस हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो. सनीचे लाखो चाहते असून, त्यांना सनीच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुक्ता आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सनीबद्दलच्या माहित नसलेल्या अनेक गोष्टी समोर येणार आहेत.