मिला योवोव्हिचशी पंगा घेणे विल्यम लेव्हीला पडले चांगलेच महागात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2017 20:15 IST2017-01-31T14:40:58+5:302017-01-31T20:15:35+5:30

हॉलीवूड सुपरस्टार मिला योवोव्हिचसोबत पंगा घेणे एवढी सोपी गोष्ट नाही. याचा प्रत्यय तिचा ‘रेसिडेंट ईव्हिल: द फायनल चाप्टर’ या ...

William Levy fell in love with Milwaukee! | मिला योवोव्हिचशी पंगा घेणे विल्यम लेव्हीला पडले चांगलेच महागात!

मिला योवोव्हिचशी पंगा घेणे विल्यम लेव्हीला पडले चांगलेच महागात!

लीवूड सुपरस्टार मिला योवोव्हिचसोबत पंगा घेणे एवढी सोपी गोष्ट नाही. याचा प्रत्यय तिचा ‘रेसिडेंट ईव्हिल: द फायनल चाप्टर’ या चित्रपटातील को-स्टार विल्यम लेव्हीला आला. शूटींग दरम्यान एका अ‍ॅक्शन सीनमध्ये विल्यम आणि मिलाला दोन हात करायचे होते. तेव्हा तिला हलक्यामध्ये घेणे त्याला चांगलेच महागात पडले.

तो सांगतो, ‘चित्रपटात भरपूर अ‍ॅक्शन आहे आणि मला अ‍ॅक्शन करायला आवडते. परंतु एका सीनमध्ये मला मिलाला ओढून खाली पाडायचे होते. हा सीन चित्रित करत असताना माझा हाताचे एक बोटे निखळले. एवढा त्रास झाला काय सांगू! मी पटकन बोट मूळ जागी आणले अन्यथा मला नाही वाटत की, माझे बोट पहिल्यासारखे राहिले असते. पुढचा संपूर्ण महिना माझा हात दुखत होता. एवढ्यावरून तर मला एक गोष्ट कळाली की, मिलाशी कधी पंगा घ्यायचा नाही.’

ALSO READ: स्टंटसाठी मिला योवोव्हिचने सोसल्या नरक यातना

विल्यम ‘रेसिडेंट ईव्हिल’ सिरीजमधील या सहव्या आणि शेवटच्या चित्रपटात ‘क्रिस्टियन’ नावाचे पात्र साकारत आहे. मुख्य नायिका अ‍ॅलाईस (योवोव्हिच) जेव्हा क्रिस्टियनच्या गटात सामील होते तेव्हा तो तिला विरोध करतो. दोघांच्या संघर्षातून त्याचे नाते विकसित होते. 

याबद्दल लेव्ही सांगातो, ‘माझे पात्र पटकन विश्वास न ठेवणारे आहे. एक दिवस जिवंत राहणे जेथे महाविजय आहे अशा वेळी अपरिचित (अ‍ॅलाइस) लोकांवर तो विश्वास करायला धजत नाही. त्यामुळे आमचा उद्देश जरी एक असला तरी सुरूवातील मी तिला खूप त्रास देतो.’

पॉल अँडरसन दिग्दर्शित ‘रेसिडेंट ईव्हिल: द फायनल चाप्टर’ चित्रपटात मिला आणि विल्यमसोबतच अली लार्टर, शॉन रॉबर्ट्स, रुबी रोझ आणि एआॅन मॅकेन यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या ३ फे ब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

ALSO READ: ​मिला योवोव्हिचला करायचेय सलमाना खानसोबत काम?

Web Title: William Levy fell in love with Milwaukee!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.