क्रिसच्या कानशिलात लगावणे विल स्मिथच्या आलं अंगाशी , ऑस्कर अकादमीने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 12:55 PM2022-04-09T12:55:46+5:302022-04-09T12:58:20+5:30

ऑस्कर 2022मध्ये या पुरस्कार सोहळ्यात विल स्मिथने सूत्रसंचालक ख्रिस रॉकच्या स्टेजवर कानाशीलात लागवली होती. ही घटना जशी घडली तसे त्याचे जगभरात विविध पडसाद उमटत गेले.

Will smith banned from oscar event gala for 10 years for slapping chris rock | क्रिसच्या कानशिलात लगावणे विल स्मिथच्या आलं अंगाशी , ऑस्कर अकादमीने घेतला मोठा निर्णय

क्रिसच्या कानशिलात लगावणे विल स्मिथच्या आलं अंगाशी , ऑस्कर अकादमीने घेतला मोठा निर्णय

googlenewsNext

जगभरात मानच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्कर 2022मध्ये या पुरस्कार सोहळ्यात अमेरिकन अभिनेता विल स्मिथ(Will Smith)मुळे सगळीकडे चर्चेत आला. या पुरस्कार सोहळ्यात विल स्मिथने सूत्रसंचालक ख्रिस रॉकच्या स्टेजवर कानाशीलात लागवली होती. ही घटना जशी घडली तसे त्याचे जगभरात विविध पडसाद उमटत गेले. अनेक चर्चांना उधाण आले.. त्यानंतर त्याने आपल्या कृत्याची माफीदेखील मागितली होती पण आता त्याच्याविरोधात ऑस्कर अकादमीने मोठा निर्यण घेतला आहे. 

ऑस्कर सोहळ्यादरम्यान अभिनेता ख्रिस रॅकला मारल्याप्रकरणी विल स्मिथवर 10 वर्षांसाठी ऑस्करमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकन अभिनेता विल स्मिथवर ऑस्कर गाला आणि इतर अकादमी कार्यक्रमांवर १० वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, विल स्मिथला 'किंग रिचर्ड' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला होता. 

 अकादमीने एका निवेदनात म्हटले आहे की " स्मिथच्या बेकायदेशीर वर्तनाने 94 व्या ऑस्करला गालबोट लागले आहे." अकादमीने पुढे सांगितले की, कलाकार आणि पाहुण्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि अकादमीवरील विश्वास पुनर्संचयित करण्यासाठी स्मिथवर बंदी घालण्यात आली आहे.


काय घडला होता प्रकार?
आपल्या पत्नीच्या शारिरीक व्यंगावर केला जाणारा विनोद आणि त्यावर उफाळलेले हास्य अभिनेता विल स्मिथ (Will Smith) याला अजिबात सहन झाले नाही. म्हणून त्याच आवेशात तो उठला आणि थेट जाऊन कार्यक्रमाचा सुत्रसंचालक तथा प्रसिद्ध अभिनेता क्रिस रॉक याच्या कानशिलात लगावली होती. 

Web Title: Will smith banned from oscar event gala for 10 years for slapping chris rock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Oscarऑस्कर