डेनियल लोकांना का मागतोय लायटर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2016 21:29 IST2016-12-25T21:29:32+5:302016-12-25T21:29:32+5:30
‘हॅरी पॉटर’ या सुपरडूपर हॉलिवूडपटात ज्या पद्धतीने डेनियल रेडक्लिफ याने भूमिका साकारलेली आहे, अगदी तसाच तो वास्तविक जीवनातही आहे. ...

डेनियल लोकांना का मागतोय लायटर?
‘ ॅरी पॉटर’ या सुपरडूपर हॉलिवूडपटात ज्या पद्धतीने डेनियल रेडक्लिफ याने भूमिका साकारलेली आहे, अगदी तसाच तो वास्तविक जीवनातही आहे. जादूच्या दुनियेत वावरताना काही तरी भन्नाट कल्पनेतून वेगळ्याच दुनियेत रममाण होणारा किंवा आपल्या खोडकर वृत्तीमुळे अडचणीत सापडणारा डेनियल वास्तविक जीवनातही प्रचंड खोडकर आहे. सध्या तो लोकांना सिगारेट-लायटरची मागणी करून धक्का देत आहे.
डेनियल धूम्रपान करीत नाही, हे बहुतेकांना माहीत आहे. त्याच्या आप्तजनांमध्ये तर ही गोष्ट लहानांपासून मोठ्यांपर्यंत चांगलीच ज्ञात आहे. अशात तो काही ओळखीच्या लोकांना अचानकच सिगारेट-लायटरची मागणी करून आश्चर्यचकीत करीत आहे. अर्थात असे करण्यामागचा त्याचा उद्देश केवळ चेष्टामस्करी आहे.
फिमेलफर्स्ट डॉट को डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार डेनियलने स्वत:च याविषयीचा खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, मी धूम्रपान करीत नाही तरीदेखील मला लोकांना लायटर मागण्यात मज्जा वाटते. जेव्हा ते लायटर देण्यासाठी खिशात हात घालतात तेव्हा त्यांच्या लक्षात येते की, हॅरी पॉटरला आपण कॅँसरच्या खाइत ढकलून गुन्हा तर करत नाही ना... पण याची मला खूप मज्जा वाटते. काही लोकांना माहीत आहे की, मी धूम्रपान करीत नाही. त्यामुळे त्यांना लायटर मागितल्यानंतर ते आश्चर्यचकीत होतात. जेव्हा त्यांच्या लक्षात येते की, मी त्यांच्याशी चेष्टामस्करी करीत आहे, तेव्हा तेदेखील माझ्या आनंदात सहभागी होतात.
डेनियल सध्या न्यू यॉर्क येथे असून, अभिनेत्री एरिन डार्क हिला डेट करीत आहे. डेनियल म्हणतोय की, सध्या मी हॅरी पॉटर चित्रपटात काम करीत नाही, मात्र मला याचे अजिबात दु:ख होत नाही. कारण बरेचसे लोक मला आजही हॅरी पॉटरच्याच नजरेने बघतात. यातील काही असेही आहेत जे मला तिरस्काराच्यादृष्टीने बघतात. त्यांच्या मते, मी पॉटरच्या सेटसाठी गुलाम होतो. मात्र आता मी यातून मुक्त झालो आहे. एमा वॉटसन, रुपर्ट ग्रिंट आणि एलेन रिकमॅन यासारख्या भारदस्त कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव चांगला होता, असेही डेनियलने सांगितले.
![]()