Watch Trailer : जस्टिस लीग’च्या ट्रेलरमध्ये सुपरहिरोंचा धमाका!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2017 18:46 IST2017-03-26T13:15:04+5:302017-03-26T18:46:08+5:30
हॉलिवूडचा बहुचर्चित चित्रपट ‘जस्टिस लीग’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, अपेक्षेप्रमाणेच ट्रेलर धमाकेदार आहे.
.jpg)
Watch Trailer : जस्टिस लीग’च्या ट्रेलरमध्ये सुपरहिरोंचा धमाका!!
ह लिवूडचा बहुचर्चित चित्रपट ‘जस्टिस लीग’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, अपेक्षेप्रमाणेच ट्रेलर धमाकेदार आहे. ‘डिसीईयू’चा पाचवा चित्रपट असून, यापूर्वी ‘सुसाइड स्क्वॉड’, ‘बॅटमॅन वर्सेज सुपरमॅन’ यासारख्या चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. या सिरीजचे आणखी काही भाग आगामी काळत प्रेक्षकांना बघावयास मिळू शकतात.
सुपरहिरोजवर आधारित गेल्या काही चित्रपटांनंतर प्रेक्षक ‘जस्टिस लीग’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच ट्रेलर रिलीज केल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. हा चित्रपट १७ नोव्हेंबर रोजी वर्ल्ड वाइज रिलीज केला जाणार आहे. दरम्यान, सुपरहिरोज सिरीजमधील धमाकेदार कारनामे ‘जस्टिस लीग’मध्येही बघावयास मिळणार आहे.
या चित्रपटात प्रेक्षकांना बॅटमॅन आणि वंडर वुमेनची टीम सायबर्ग, एक्वामॅन आणि फ्लॅश यांना एकत्र आणताना बघावयास मिळणार आहे. जेणेकरून ही टीम पृथ्वीला विनाशापासून रोखू शकेल. या चित्रपटात सुपरमॅनची भूमिका गायब करण्यात आली आहे. कारण गेल्या चित्रपटात ‘सुपरमॅन’ मारण्यात आल्याचे दाखविण्यात आले होते.
ट्रेलरनुसार चित्रपटात धमाकेदार अॅक्शन सीन्स असून, प्रेक्षकांना ती चांगलीच भावत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन जॅक सिंडर यांनी केले असून, स्क्रीनप्ले क्रीस टेरिओ यांनी लिहिले आहे. बेन अफ्लेक, हेनरी कॅविल, गल गॅडोट, जेसन मोमा, रे फिशर आणि एमी अॅडम्स यामध्ये सुपरहिरोंच्या भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहेत. या सुपरहिरोजचा धमाका जबरदस्त असून, इतर चित्रपटांप्रमाणेच याही चित्रपटाला प्रेक्षकांची जबरदस्त पसंती मिळण्याची शक्यता आहे.