Watch Trailer : ...अखेर ‘बेवॉच’च्या दुसऱ्या ट्रेलरमध्ये डायलॉग बोलताना दिसली प्रियंका चोपडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2017 09:38 IST2017-03-26T13:23:02+5:302017-03-27T09:38:34+5:30

​‘बेवॉच’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये डेब्यू करीत असलेली प्रियंका चोपडा चित्रपटाच्या पहिल्या ट्रेलरमध्ये काही सेंकदच बघावयास मिळाल्याने तिच्या चाहत्यांची घोरनिराशा झाली होती.

Watch Trailer: ... Finally, Priyanka Chopra appeared in the second trail of Bevoach. | Watch Trailer : ...अखेर ‘बेवॉच’च्या दुसऱ्या ट्रेलरमध्ये डायलॉग बोलताना दिसली प्रियंका चोपडा!

Watch Trailer : ...अखेर ‘बेवॉच’च्या दुसऱ्या ट्रेलरमध्ये डायलॉग बोलताना दिसली प्रियंका चोपडा!

ेवॉच’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये डेब्यू करीत असलेली प्रियंका चोपडा चित्रपटाच्या पहिल्या ट्रेलरमध्ये काही सेंकदच बघावयास मिळाल्याने तिच्या चाहत्यांची घोरनिराशा झाली होती. आता चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, त्यात किमान एक डायलॉग बोलताना प्रियंका दिसत आहे. या ट्रेलरमध्ये तिला फारसे समाधानकारक स्थान मिळाले नसले तरी, तिच्या तोंडून ऐकावयास मिळत असलेला डायलॉग तिच्या फॅन्सला नक्कीच सुखावणारा असेल. 

ट्रेलरमध्ये चित्रपटातील मुख्य कलाकार ड्वेन जॉनसन आणि जॅक एफ्रॉन या दोघांनाच अधिक स्थान देण्यात आले आहे. फक्त एकाच ठिकाणी प्रियंका ड्वेन जॉनसनसोबत डायलॉग बोलताना बघावयास मिळत आहे. चित्रपटात प्रियंका व्हिक्टोरिया लिड्स नावाची निगेटिव्ह भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये ती ड्वेन जॉनसनला म्हणतेय की, ‘काही लोक कुठल्याच गोष्टींसाठी चांगले नसतात’. प्रियंकाचा आवाज आणि अ‍ॅटिट्यूट जबरदस्त असून, तिने निगेटिव्ह भूमिकेला पुरेपूर न्याय दिल्याचे दिसून येत आहे. 



आतापर्यंत रिलीज करण्यात आलेल्या दोन्ही ट्रेलरवरून ‘बेवॉच’ हा चित्रपट मनोरंजक असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये काही स्टंट सीक्वेंसही दाखविण्यात आले आहेत. शिवाय ड्वेन जॉनसनचे अ‍ॅब्स दाखविणारे काही सीन्सही यामध्ये आहेत. ट्रेलरच्या सुरुवातीलाच ‘बेवॉच’मध्ये तुमचे स्वागत आहे. आमची टीम सर्वांत चांगली आहे’ असे म्हणताना ड्वेन दिसतो. 

सेठ गोडीन यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट ९०च्या दशकातील प्रसिद्ध टीव्ही सीरीजवर आधारित आहे. ज्यामध्ये पामेला अ‍ॅँडरसन आणि डेविड हॅसलहॉफ यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. जेव्हा पहिल्या ट्रेलरमध्ये प्रियंकाला काही सेकंदच दाखविण्यात आले होते तेव्हा तिची आई मधु चोपडा हिने प्रियंकाला कमी दाखविण्यामागे चित्रपटाची प्रमोशन स्ट्रॅटेजी असल्याचे म्हटले होते. हा चित्रपट येत्या २६ मे रोजी रिलीज होणार आहे. 

Web Title: Watch Trailer: ... Finally, Priyanka Chopra appeared in the second trail of Bevoach.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.