व्हर्चुअल मीटमध्ये एक्स-वाइफ जेनिफरसोबत फ्लर्ट करताना दिसला ब्रॅड पिट, व्हिडीओ व्हायरल
By अमित इंगोले | Updated: October 1, 2020 15:14 IST2020-10-01T15:08:14+5:302020-10-01T15:14:25+5:30
या दोघांना पाहून त्यांच्या फॅन्सच्या चेहऱ्यावर हसू फुललं. या मीटमध्ये असलेली ज्युलिया रॉबर्ट आणि मॉर्गन फ्रीमॅन हेही स्वत:ला हसण्यापासून रोखू शकले नाहीत.

व्हर्चुअल मीटमध्ये एक्स-वाइफ जेनिफरसोबत फ्लर्ट करताना दिसला ब्रॅड पिट, व्हिडीओ व्हायरल
Angelina Jolie पासून वेगळा झाल्यानंतर हॉलिवूड स्टार ब्रॅड पिट आणि त्याची एक्स वाइफ जेनिफर एनिस्टन यांच्यातील जवळीकता वाढू लागली आहे. कोरोना काळात दोघे एकमेकांना भेटू शकले नाहीत. पण नुकतेच एका व्हर्चुअल मीटदरम्यान अनेक दुसऱ्या सेलिब्रिटींसमोर दोघे फ्लर्ट करताना दिसले. या दोघांना पाहून त्यांच्या फॅन्सच्या चेहऱ्यावर हसू फुललं. या मीटमध्ये असलेली ज्युलिया रॉबर्ट आणि मॉर्गन फ्रीमॅन हेही स्वत:ला हसण्यापासून रोखू शकले नाहीत.
जेनिफिर एनिस्टन आणि ब्रॅड पिट २०००-२००५ पर्यंत सोबत संसार करत होते. त्यानंतर दोघे वेगळे झाले होते. नुकतंच एका व्हर्चुअल मीटमध्ये रीडींग सेशनचं आयोजन करण्यात आलं होतं. यात ब्रॅड पिट आणि जेनिफर एनिस्टनसोबतच ज्युलिया रॉबर्ट मॅथ्यू मॅक्कॉनौघे, शॉन पेन, हेनरी गोल्डींग, शिया ला बियोफ, जिमी किमेल, जॉन लीजेंड आणि रे लिओटा यांनीही भाग घेतला होता.
Hi Aniston!
— Shreemi Verma (@shreemiverma) September 18, 2020
Hi Pitt!
How you doin'? pic.twitter.com/7jJjRYJBNQ
रीडींग सेशन दरम्यान ब्रॅड पिट आणि जेनिफर एनिस्टनची 'फ्लर्ट क्लिप' सोशल मीडियात चांगलीच व्हायरल झाली आहे. दोघेही मस्ती-गंमत करताना दिसत आहेत. एनिस्टन म्हणते, 'हाय पिट'. यावर ब्रॅड पिट म्हणाला, 'हाय एनिस्टन, कशी आहेस?'. यावर जेनिफर उत्तर देते की, 'गुड हनी, मी ठीक आहे. तू कसा आहेस?'.
दरम्यान, जेनिफर एनिस्टन ही 'फ्रेंड्स' मालिकेतून चर्चेत आली होती. ज्यानंतर तिला हॉलिवूडमध्ये खूप ओळख मिळाली. असे सांगितले जात आहे की, या टेबल रीड सेशनमधून जेही पैसे येतीलल ते Community Organized Relief Effort आणि REFORM Alliance नावाच्या संस्थांना दान दिले जातील. या दोन्ही संस्था कोरोनाग्रस्त लोकांची मदत करत आहेत.