विन डिझेलला वाटते ‘फास्ट-८’ जिंकू शकतो आॅस्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 15:17 IST2016-10-20T14:19:37+5:302016-10-20T15:17:14+5:30
विन डिझेल फार महत्त्वकांक्षी अॅक्टर आहे. जेवढ्या तन्मयतेने तो सिनेमात काम करतो, तेवढीच मोठी आशा ता चित्रपटाच्या यशाबाबत बाळगतो. ...

विन डिझेलला वाटते ‘फास्ट-८’ जिंकू शकतो आॅस्कर
व न डिझेल फार महत्त्वकांक्षी अॅक्टर आहे. जेवढ्या तन्मयतेने तो सिनेमात काम करतो, तेवढीच मोठी आशा ता चित्रपटाच्या यशाबाबत बाळगतो. आता आगामी ‘फास्ट-८’बद्दल तर तो जरा जास्तच आशावादी दिसतोय.
पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या या ‘एफएफ’ सिरीजमधील आठव्या सिनेमाचे भविषय सांगताना तो म्हणाला की, मला विश्वास आहे की, ‘फास्ट-८’ आॅस्करवर आपली मोहर उमटवू शकतो. कारण यंदा आम्ही अत्यंत जबरदस्त कथानक घेऊन येत आहोत. त्यामुळे मी खूप आशावादी आहे.
त्याच्या या आशावादामागे खरे कारण आहे ते या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे. ‘स्ट्रे आॅऊटा कॉम्प्टन’ फेम एफ. गॅरी ग्रे ‘फास्ट-८’चे दिग्दर्शन करीत आहे. मागच्या वर्षी अनेक पुरस्कारांवर आणि तिकिट खिडकीवर यशस्वी ठरलेल्या ‘स्ट्रे आॅऊटा कॉम्प्टन’नंतर त्याच्याकडून अपेक्षादेखील वाढल्या आहेत.
![Furious 7]()
‘फास्ट अँड फ्युरिअस 7
डिझेल म्हणतो की, ‘मला खरंच वाटत होते की, गॅरी ग्रेच्या या सिनेमाला आॅस्कर मिळायला हवा होता. परंतु पुढच्या वर्षी ‘फास्ट-८’च्या निमित्ताने ही कमीदेखील भरून निघेल. पुढील भागाचे कथानक गंभीर आणि पात्रांचे निराळे रंग दाखवणारे आहे.
स्वत:च्या भूमिकेविषयी त्याने सांगितले की, ‘माझे पात्र एकदम निराळ्या पद्धतीने यामध्ये पाहायला मिळणार आहे. सातव्या भागातील भावनिक शेवटानंतर मोठ्या बदलांतून ते गेले आहे. ते पाहून प्रेक्षकांना नक्कीच धक्का बसणार.’
सिरीजमधील आठव्या चित्रपटाचे ट्रेलर अनोख्या पद्धतीने लाँच केले जाणार आहे. ११ डिसेंबर रोजी न्यूयॉर्क येथील जगप्रसिद्धा टाईम स्क्वेअरवरील प्रत्येक स्क्रीनवर ते दाखवले जाणार आहे. चोहीबाजूने चाहत्यांवर ‘एफएफ-८’चा भडिमार करण्याची आमची कल्पना असल्याचे त्याने सांगितले.
![Vin d]()
फास्ट अँड फ्युरिअस
विन डिझेलने आता चित्रपटाविषयी एवढा अपेक्षा वाढवून दिल्या आहेत की, पुढील वर्षी १४ एप्रिल रोजी प्रदर्शित झाल्यावर त्या खऱ्या ठरतात का, फोल ठरतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच डिझेल आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘ट्रिपल एक्स’बद्दलसुद्धा चाहत्यांना उत्सुकता आहे.