​विद्या बालनचा बॉक्स आॅफिसरवर ‘व्हॅम्पायर’शी लढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2016 15:57 IST2016-11-25T15:57:48+5:302016-11-25T15:57:48+5:30

भारतात हॉलीवूड चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये खूप मोठी वाढ झाली आहे. म्हणून तर आता हॉलीवूड सिनेमेसुद्धा हिंदी चित्रपटांना बॉक्स आॅफिसवर ...

Vidya Balan's fight against 'vampire' on Box Officer | ​विद्या बालनचा बॉक्स आॅफिसरवर ‘व्हॅम्पायर’शी लढा

​विद्या बालनचा बॉक्स आॅफिसरवर ‘व्हॅम्पायर’शी लढा

रतात हॉलीवूड चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांमध्ये खूप मोठी वाढ झाली आहे. म्हणून तर आता हॉलीवूड सिनेमेसुद्धा हिंदी चित्रपटांना बॉक्स आॅफिसवर तगडी टक्कर देताना दिसतात. असेच ‘हॉलीवूड वि. बॉलीवूड’ बॉक्स आॅफिस वॉर येत्या दोन डिसेंबर रोजी रंगणार आहे.

केट बेकिन्सेल स्टारर ‘अंडरवर्ल्ड : ब्लड वॉर्स’ आणि विद्या बालनचा ‘कहाणी २’ हे दोन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. भलेही दोन्ही चित्रपट एकमेकांपासून एकदम वेगळे असले (एक व्हॅम्पायर-वेअरवुल्फ सागा तर दुसरा इमोशनल ड्रामा थ्रिलर) तरी दोघांमध्ये काही गोष्टी कॉमन आहेत.

आता तुम्हाला वाटत असेल की, दोन विरुद्ध टोकांच्या जॉन्रमधील या दोन सिनेमांत काय साम्य असू शकते? थोडा विचार केला तर चार गोष्टी समान आढळून येतात. त्या म्हणजे -


हॉलीवूड वि. बॉलीवूड : केट बेकिन्सेल आणि विद्या बालन

१. सिक्वेल्स : दोन्ही चित्रपट हे सिक्वेल आहेत. ‘ब्लड वॉर्स’ ही ‘अंडरवर्ल्ड’ सीरिजमधील पाचवी फिल्म आहे तर ‘कहाणी २’ हा २०१२ साली आलेल्या ‘कहाणी‘चा सिक्वेल आहे.

२. केट आणि विद्या आईच्या भूमिकेत : दोन्ही चित्रपटांतील मुख्य नायिका आईची भूमिका साकारत आहेत. विशेष म्हणजे आपल्या मुलीच्या रक्षणासाठी कोणताही धोका पत्कारण्याची धमक या दोघींमध्ये आहे. 

३. वॉन्टेड हीरोईन्स : केट बेकिन्सेल आणि विद्या बालनचे पात्र चित्रपटांमध्ये वॉन्टेड आहे. एकीकडे जेथे अपहरण आणि खुनाच्या गुन्ह्यासाठी विद्याच्या पाठीमागे पोलीस लागलेले आहेत तर दुसरीकडे मुलीला व्हॅम्पायर आणि वेअरवुल्फपासून लपून ठेवलेल्या केटच्या रक्तासाठी ते तिच्या मागावर आहेत.

४. शक्तीशाली महिला पात्र : मोठ्या पडद्यावर सहसा सशक्त महिला भूमिका पाहायला मिळत नाहीत. हे दोन्ही चित्रपट मात्र याला अपवाद आहेत. केटची ‘सेलिना’ आणि विद्याची ‘बिद्या’ या दोघी अत्यंत धीरोदात्त महिला आहेत.

मग केट आणि विद्यापैकी बॉक्स आॅफिसवर बाजी कोण मारणार हे तर सिनेमे प्रदर्शित झाल्यावर कळेलच; परंतु सिनेरसिकांना वैविध्यपूर्ण चित्रपटांची मेजवाणी मिळणार एवढे मात्र पक्के आहे.

Web Title: Vidya Balan's fight against 'vampire' on Box Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.