Video Viral : एमा वॉटसनचा प्रमोशन कारनामा ठरला हिट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2017 14:01 IST2017-03-18T08:31:16+5:302017-03-18T14:01:16+5:30

​हल्ली आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कलाकार काय करतील हे सांगणे मुश्किलच म्हणावे लागेल. अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने तिच्या सिनेमासाठी वापरलेल्या फंड्यांवरून तुम्हाला याचा अंदाज लावता येईल.

Video Viral: Emma Watson promoted to hit hit! | Video Viral : एमा वॉटसनचा प्रमोशन कारनामा ठरला हिट!

Video Viral : एमा वॉटसनचा प्रमोशन कारनामा ठरला हिट!

्ली आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कलाकार काय करतील हे सांगणे मुश्किलच म्हणावे लागेल. अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने तिच्या सिनेमासाठी वापरलेल्या फंड्यांवरून तुम्हाला याचा अंदाज लावता येईल. असाच काहीसा कारनामा हॉलिवूड अभिनेत्री एमा वॉटसन हिने केला आहे. तिच्या आगामी ‘ब्यूटी अ‍ॅण्ड द बीस्ट’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी एमा असे काही करताना दिसली जे तिच्या स्वभावाच्या अगदीच विपरीत होते. त्यामुळे एमाचा हा प्रमोशन फंडा सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. 

त्याचे झाले असे की, हॅरी पॉटरची प्रसिद्ध अभिनेत्री असलेली एमा एका टीव्ही साप्ताहिकाच्या पत्रकारांना इंटरव्ह्यू देण्यासाठी आली होती. मात्र ज्या ठिकाणी इंटरव्ह्यूचा कार्यक्रम ठेवला होता, तेथे एमा मांजरांच्या पिल्लांशी खेळताना दिसली. एमा असे का करत आहे, हे क्षणभर पत्रकारांनाही समजले नाही. जेव्हा याविषयीची माहिती घेतली गेली, तेव्हा तिची ही वागणूक तिच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनचा फंडा असल्याचे समोर आले. 



मात्र जेव्हा तिचा मांजरांसोबतचा हा व्हिडीओ सोशल मीडियासह, यु-ट्यूबवर व्हायरल झाला तेव्हा एमाचा कारनामा बघून सगळेच दंग झाले. १६ मार्च रोजी यु-ट्यूबवर अपलोड केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत २,१६३,०६१ एवढ्या वेळेपेक्षाही अधिक बघण्यात आला आहे. वास्तविक एमाला खूपच परिपक्व अभिनेत्री म्हणून बघितले जाते, अशात तिने केलेला हा कारनामा सगळ्यांनाच गोंधळात पाडणारा ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच एमाने तिच्या भारतीय फॅन्सला ‘हॅप्पी होली’ असा संदेश दिला होता. हादेखील तिच्या फिल्मस्च्या प्रमोशनचाच एक भाग होता. 

एमा आणि वाद
गेल्या काही दिवसांपूर्वी एका साप्ताहिकाच्या कव्हर पेजवर एमाचा फोटो प्रसिद्ध केल्याने ती वादात सापडली होती. एमाच्या या फोटोवरून सोशल मीडियावर वादंग निर्माण झाले होते. ‘हॅरी पॉटर’ या सिनेमात एमाने हरमायनी नावाची अतिशय लोकप्रिय अशी भूमिका साकारलेली आहे. ‘वॅनिटी फेयर’ या साप्ताहिकासाठी एमाने फोटोशूट केले होते. 

वार्डरोब मालफंक्शनचा बळी ठरली होती एमा
याच वर्षी सिनेमाच्या प्रीमियरसाठी आलेली एमा वाटसन वार्डरोब मालफंक्शनचा बळी ठरली होती. यावेळी एमा प्रीमियरसाठी लॉज एंजलिस येथे होती. प्रीमियरसाठी तिने बॅकलेस ड्रेस परिधान केला होता. रेड कार्पेटवर एंट्री करताच तिचा ड्रेस खाली घसरला. मात्र एमाने वेळीस सावधगिरी बाळगत ड्रेस सावरला. मात्र यामुळे ती त्यावेळेस चांगलीच चर्चेत आली होती.  

Web Title: Video Viral: Emma Watson promoted to hit hit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.