​१६ वर्षांपूर्वीच ‘सिम्पसन्स’ने केली होती ट्रम्पची भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2016 10:19 IST2016-11-10T18:39:20+5:302016-11-12T10:19:20+5:30

प्रसिद्ध अ‍ॅनिमेटेड टीव्ही कॉमेडी शो ‘द सिम्पसन्स’मध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष करण्यात आलेल्या अनेक भविष्यवाण्या कमी-अधिक प्रमाणात खऱ्या ठरत असतात; परंतु ९ ...

Trump's prediction was done by Simpsons 16 years ago | ​१६ वर्षांपूर्वीच ‘सिम्पसन्स’ने केली होती ट्रम्पची भविष्यवाणी

​१६ वर्षांपूर्वीच ‘सिम्पसन्स’ने केली होती ट्रम्पची भविष्यवाणी

रसिद्ध अ‍ॅनिमेटेड टीव्ही कॉमेडी शो ‘द सिम्पसन्स’मध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष करण्यात आलेल्या अनेक भविष्यवाण्या कमी-अधिक प्रमाणात खऱ्या ठरत असतात; परंतु ९ नोव्हेंबर रोजी जेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि त्यांची आतापर्यंतची सर्वात मोठी भविष्यवाणी खरी ठरली.

हिलरी क्लिंटन यांना नमवून अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष बनलेल्या डोनाल्ड ट्रम्पचा हा विजय सोळा वर्षांपूर्वीच ‘द सिम्पसन्स’ या मालिकेतील एका एपिसोडमध्ये भाकित केला होता. मार्च २००० मध्ये टेलिकास्ट झालेल्या ‘बार्ट टू द फ्युचर’ नावाच्या एपिसोडमध्ये लिजा नावाचे पात्र जेव्हा अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष बनते तेव्हा ती म्हणते की, ‘गत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सरकारने कोलमडून ठेवलेल्या अर्थव्यवस्थेचा वारसा मला लाभला आहे.’

मालिकेचा लेखक डॅन ग्रीनी सांगतो की, ‘ही अमेरिकन जनतेसाठी ‘वॉर्निंग’ होती. आमच्या इशाऱ्याकडे जर लोकांनी नीट लक्ष दिले असते तर आज ही वेळ आली नसती. ज्यापद्धतीने अमेरिकेन लोकांची मानसिकता बदलत आहे त्यानुसार आम्ही तशी कल्पना केली होती. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनने यापेक्षा वाईट काय असू शकते? अशी त्यामागे संकल्पना होती.’



‘द सिम्पसन्स’ क्रिएटर मॅट ग्रोएनिंगने सांगतले की, ‘२००० सालीच आम्ही ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होणार अशी भविष्यवाणी केली होती. त्यावेळी केवळ जोक म्हणून त्याचे नाव घेतले होते. तोच जोक आता कटू सत्य झाल्याचे पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. ’

Web Title: Trump's prediction was done by Simpsons 16 years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.