Trailer Launch : ‘लाइफ’चा ट्रेलर मनात धडकी भरविणारा; पहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 22:43 IST2017-02-12T17:13:19+5:302017-02-12T22:43:19+5:30

हॉलिवूडच्या बहुचर्चित ‘लाइफ’ या सिनेमाचा हिंदी ट्रेलर नुकताच रिलिज करण्यात आला असून, ट्रेलरमधून हा सिनेमा खूपच भीतीदायक वाटत आहे.

Trailer Launch: Trailer of 'Life' shocks his mind; Watch video | Trailer Launch : ‘लाइफ’चा ट्रेलर मनात धडकी भरविणारा; पहा व्हिडीओ

Trailer Launch : ‘लाइफ’चा ट्रेलर मनात धडकी भरविणारा; पहा व्हिडीओ

लिवूडच्या बहुचर्चित ‘लाइफ’ या सिनेमाचा हिंदी ट्रेलर नुकताच रिलिज करण्यात आला असून, ट्रेलरमधून हा सिनेमा खूपच भीतीदायक वाटत आहे. पुढच्या महिन्यात रिलिज होणाºया या सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. 

हॉलिवूडच्या सिनेमांचा एक वेगळाच अंदाज असतो. खरं तर येथील निर्मात्यांच्या कल्पनाशक्तीचे जगभरात गोडवे गायिले जातात. आतापर्यंत आलेल्या बºयाचशा सिनेमांमध्ये हे सिद्धही झाले आहे. आता असाच सायन्स फिक्शन ‘लाइफ’ हा सिनेमा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. सिनेमात मंगळ ग्रहावर सजीवाचा शोध घेताना होणाºया घटना दाखविण्यात आल्या आहेत. अर्थात या भीतीदायक आहेत. 



सिनेमाचे दिग्दर्शन डेनियल एस्पिनोसा यांनी केले आहे. या जबरदस्त सायन्स एडवेंचर्स सिनेमात ‘डेडपोल’ अभिनेता रायन रोनाल्डस पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणार आहेत. रायनबरोबर ब्रोकबॅँक माउंटेनचा अभिनेता जॅक ग्लॅनहाल हा सुद्धा झळकणार असल्याने दोघांची केमिस्ट्री सिनेमात रंगत निर्माण करणार आहे. 

गेल्या वर्षी रिलिज करण्यात आलेल्या या सिनेमाच्या टीजरने जबरदस्त धूम उडवून दिली होती. भारतीय प्रेक्षकांना तर या सिनेमाची अक्षरश: आतुरता लागली होती. ‘लाइफ’ हा सिनेमा त्या सहा लोकांची कथा आहे जे मंगळ ग्रहावर जीवसृष्टी शोधण्याचे अभियान राबवितात. यादरम्यान त्यांच्यासोबत अनेक घडामोडी घडतात. या सर्व घटना अंगावर शहारे आणणाºया असल्याने हा सिनेमा प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करेल, यात शंका नाही. 

हा सिनेमा २४ मार्च रोजी अमेरिकेसह जगभरात रिलिज केला जाणार आहे. ट्रेलरमध्ये ‘लाइफ’ची कथा मनात धडकी भरविणारी असल्याचेच दिसून येते. 

Web Title: Trailer Launch: Trailer of 'Life' shocks his mind; Watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.