​टिल्डा शिकली ‘डॉ. स्ट्रेंज’साठी मार्शल आर्टस्

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2016 14:52 IST2016-10-30T14:52:58+5:302016-10-30T14:52:58+5:30

प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्री टिल्डा स्विंटन भूमिकेप्रती असणाऱ्या समर्पणासाठी ओळखली जाते. म्हणूनच तर आगामी ‘डॉ. स्ट्रेंज’ या सुपरहीरो चित्रपटासाठी तिने ...

Tilde learned 'Dr. Martial arts for strangers | ​टिल्डा शिकली ‘डॉ. स्ट्रेंज’साठी मार्शल आर्टस्

​टिल्डा शिकली ‘डॉ. स्ट्रेंज’साठी मार्शल आर्टस्

रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्री टिल्डा स्विंटन भूमिकेप्रती असणाऱ्या समर्पणासाठी ओळखली जाते. म्हणूनच तर आगामी ‘डॉ. स्ट्रेंज’ या सुपरहीरो चित्रपटासाठी तिने प्रतिष्ठित मार्शल आर्ट्स गुरुंकडून ती कला शिकली. सिनेमात ती ‘एन्शियंट वन’चे पात्र साकारत आहे.

तिने सांगितले की, ‘माझ्या भूमिकेच्या तयारीसाठी मी ज्युलियन डॅनियल्स आणि इतर जगप्रसिद्ध गुरुंकडून मार्शल आर्ट्सचे ट्रेनिंग घेतले आहे. ही कला शिकताना मला खरंच खूप मजा आली. मी अशा काही गोष्टी शिकत होते ज्या मी हा चित्रपट नसता तर कधीच शिकले नसते. त्यामुळे आयुष्यभर लक्षात राहिला असा अनुभव राहिला.’

चित्रपटात काही तरी वेगळे करण्यासाठी काही तरी हटके आणि ओरिजिनल करणे गरजेचे असते. आतापर्यंत कधीही न पाहिलेले सिक्वेन्स या चित्रपटात तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यासाठीच आम्ही एवढी मेहनत घेतल्याचे ती सांगते.

फाईट सीन्स शक्य तेवढे असली वाटण्यासाठी मी तज्ज्ञ मार्शल आर्ट्स शिकक्षकांकडे कठोर प्रशिक्षण घेतले. केवळ प्राचीन काळातील लोकांना अवगत असलेली कला मला शिकायला मिळाली ही खूप मोठी बाब आहे.

सहकाऱ्यांची स्तुती करताना ती म्हणते, खरं सांगायचे तर या चित्रपटात निवड झालेले सर्वच कलाकार खूप नशीबवान आहेत. सर्वांनीच खूप चांगले काम केले आहे. एकत्र मिळून हा चित्रपट यशस्वी करून दाखवायचा या प्रेरणेनेच आम्ही मेहनत घेत होतो.

Web Title: Tilde learned 'Dr. Martial arts for strangers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.