टेलर स्विफ्टचे घर लॅण्डमार्क म्हणून होणार घोषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 21:31 IST2017-01-25T16:01:18+5:302017-01-25T21:31:18+5:30

प्रसिद्ध हॉलिवूड गायिका टेलर स्विफ्ट हिला असे वाटते की, तिचे बेवर्ली हिल्स येथील घराला लॅण्डमार्क म्हणून घोषित करायला हवे. ...

Taylor Swift's house announced as Landmark | टेलर स्विफ्टचे घर लॅण्डमार्क म्हणून होणार घोषित

टेलर स्विफ्टचे घर लॅण्डमार्क म्हणून होणार घोषित

रसिद्ध हॉलिवूड गायिका टेलर स्विफ्ट हिला असे वाटते की, तिचे बेवर्ली हिल्स येथील घराला लॅण्डमार्क म्हणून घोषित करायला हवे. ‘शेक इट आॅफ’ यासारखे सुपरहिट सिनेमा देणारी टेलर स्विफ्ट सध्या तिच्या या घराची रंगरंगोटी करण्यात व्यस्त आहे. या घराचे मालकी हक्क अगोदर हॉलिवूड निर्माता सॅम्युअल गोल्विन याच्या परिवाराकडे होते.
 


आलिशान असलेल्या या घराचे बांधकाम १९३४ मध्ये करण्यात आले होते. त्यामुळे सध्या या घराच्या मेन्टेनन्सचे काम केले जात आहे. टेलर या घराला नवे स्वरूप देण्याच्या प्रयत्नात असून, तिने तिच्या कामाला पूर्णविराम देऊन पूर्णवेळ ती घराच्या दुरुस्तीच्या कामी लक्ष घालत आहे. घराला ज्या पद्धतीने झळाळी मिळत आहे, त्यावरून याला लॅण्डमार्क घोषित केला जावा अशी तिची इच्छा आहे. नुकतेच तिने बेवर्ली हिल्स येथील ‘कल्चरल हेरिटेज कमिशन’ या संस्थेची मंजुरीदेखील प्राप्त केली आहे. 

विशेष म्हणजे या संस्थेच्या पाच सदस्यांनी ११ जानेवरी रोजी या घराला भेट देऊन त्याला स्थानिक लॅण्डमार्क म्हणून घोषित केले जावे असा रिमार्कदेखील नोंदविला आहे. सहा बेडरूम, पाच बाथरूम असलेले हे घर १०९८२ स्केअर फूट एवढ्या जागेत बांधण्यात आलेले आहे. या आलिशान घराची लॅण्डमार्क म्हणून घोषणा करणे जवळपास निश्चित मानले जात असून, केवळ बेवर्ली हिल्स सिटी कौन्सिल यांची अंतिम मान्यता मिळणे बाकी आहे.  



टेलरने हेरिटेज कमिशन यांची मान्यता प्राप्त केल्याने या घराला लॅण्डमार्क म्हणून मान्यता मिळण्याची जवळपास ९० टक्के प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता सिटी कौन्सिलने मान्यता दिल्यास हे घर लॅण्डमार्क म्हणून घोषित केले जाणार आहे. 

Web Title: Taylor Swift's house announced as Landmark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.