​स्टार वॉर्स फिव्हर : या ‘स्पेस मुव्हीज’ तुम्ही पाहाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 15:53 IST2016-12-15T15:52:38+5:302016-12-15T15:53:24+5:30

पंधरा वर्षांच्या गॅपनंतर पोठोपाठ दोन वर्षे नव्या ‘स्टार वॉर्स’ फिल्म पाहायला मिळाल्या. मागच्या वर्षी ‘फोर्स अवेकन्स’ आणि आता स्पीन ...

Star Wars Fever: You see these 'Space Movies'! | ​स्टार वॉर्स फिव्हर : या ‘स्पेस मुव्हीज’ तुम्ही पाहाच!

​स्टार वॉर्स फिव्हर : या ‘स्पेस मुव्हीज’ तुम्ही पाहाच!

धरा वर्षांच्या गॅपनंतर पोठोपाठ दोन वर्षे नव्या ‘स्टार वॉर्स’ फिल्म पाहायला मिळाल्या. मागच्या वर्षी ‘फोर्स अवेकन्स’ आणि आता स्पीन आॅफ/प्रीक्वल ‘रोग वन’ने स्टार वॉर्स फॅन्सना खुश केले. मुळ स्टार वॉर्स (१९७७) चित्रपटाच्या पूर्वी काय घडले होते हे सांगण्यासाठी तीन सिनेमांची मालिका तयार करण्यात येणार आहे .

त्यांपैकी पहिला चित्रपट म्हणजे ‘स्टार वॉर्स : रोग वन’ रिलीज झाला. स्पेस अ‍ॅडव्हेंचर आणि अ‍ॅक्शनच्या चाहत्यांचे जर हा चित्रपट पाहून मन भरले नसेल किंवा ज्यांना आणखी स्पेस मुव्हीज पाहण्याची इच्छा झाली असेल, त्यांच्यासाठी आम्ही काही गाजलेल्या चित्रपटांचा पर्याय सुचवत आहोत.

२००१ : अ स्पेस ओडिसी (१९६८)



पाच दशकांनंतरही स्टॅनली क्युब्रिक दिग्दर्शित हा क्लासिक चित्रपट नवदिग्दर्शकांना प्रेरित करीत आहे. ‘स्पेस मुव्हीज’ या प्रकारातील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणूनही याची ख्याती आहे.

गुरू ग्रहावर एक रहस्यमय वस्तू आढळून येते आणि सुरू होतो डेव्ह बोव्हमन आणि फ्रँकच्या अंतराळ प्रवास. यामध्ये त्यांना आयकॉनिक कॉम्प्युटर ‘हॅल ९०००’ मदत करते. अंतराळात कथानक घडणारे चित्रपट पाहणाऱ्यांनी सर्वप्रथम या चित्रपटापासूनच सुरूवात करावी.
ग्रॅव्हिटी (२०१३)



अल्फॉन्सो क्युरॉन दिग्दर्शित या चित्रपटात सिनेइतिहासातील सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्टस् पाहायला मिळतात. परंतु मोठ्या पडद्यावर विस्मयीकारक सीजीआय अ‍ॅक्शन पाहण्याबरोबरच चित्रपटाची भावनिक कथा या सिनेमाला अभिजाततेच्या अत्युच्च पातळीवर नेऊन ठेवते.

सात आॅस्कर पुरस्कार विजेत्या ‘ग्रॅव्हिटी’मध्ये सँड्रा बुलक आणि जॉर्ज क्लुनी अंतराळवीरांच्या भूमिकेत असून अपघातानंतर सुरक्षित पृथ्वीवर येण्यासाठी त्यांना करावा लागणारा संघर्ष पाहून आपण आवाक होतो.
मून (२००९)



सायकोलॉजिकल स्पेस थ्रीलर म्हणून डंकन जोन्स दिग्दर्शित या चित्रपटाचा कोणीच हात धरू शकत नाही. चित्रपटात सॅम रॉकवेल करिअर बेस्ट परफॉर्मन्स देत प्रमुख भूमिकेत असून ‘जीईआरटीवाय’ कॉम्प्युटरच्या (आवाज - केविन स्पेसी) मदतीने तो चंद्रावरून महत्त्वाचे रिसोर्स पृथ्वीवर पाठवण्याचे काम करत असतो.

सर्वोत्कृष्ट एक-पात्री सिनेमा म्हणूनही तो ओखळला जातो. चंद्रावर एकटा राहणाºया अंतराळवीराच्या मनातील आणि डोक्यातील प्रश्नांची उत्तरे शोधाणारा हा चित्रपट आवर्जुन पाहा.
अपोलो १३ (१९९५)



चांद्रमिशनवर गेलेल्या ‘अपोलो १३’ यानात बिघाड झाल्यानंतर त्यातील तीन अ‍ॅस्ट्रोनॉटस्ना (टॉम हँक्स, केविन बेकन आणि बिल पॅक्स्टन) पृथ्वीवर सुखरूप परत आणण्याचा रोचक अनुभव रॉन हॉवर्ड दिग्दर्शित या सिनेमात पाहायला मिळतो. ड्रामा, इमोशन, अ‍ॅडव्हेंचर असा सगळा मसाला या चित्रपटा आहे. शिवाय एखादे स्पेस मिशन नेमके कसे असते याचा तपशीलही ‘अपोलो १३’मध्ये कळतो.
एलियन (१९७९) व एलियन्स (१९८६)



स्पेसमध्ये हॉरर अनुभव देणारे हे दोन चित्रपट कमाल आहेत. रिडले स्कॉट दिग्दर्शित एलियन (१९७९) आणि त्याचा सिक्वेल जेम्स कॅमेरून (टायटॅनिक/अवतार फेम) दिग्दर्शित एलियन्स (१९८६) म्हणजे अंगावर शहारे आणणारे चित्रपट आहेत. सिगौर्नी विव्हरच्या रुपात सिनेसृष्टीत सर्वोत्कृ ष्ट नायिकांपैकी एक ‘रिपले’ची ही गोष्ट आहे. अंतराळातील दूरवरच्या अनोळखी प्रदेशात त्यांच्या यानावर परजीव (एलियन) हल्ला करतात. पृथ्वीवर सुरक्षित परत येण्यासाठी प्रयत्नांची करावी लागणारी पराकाष्ठा या चित्रपटात पाहायला मिळते.
हेदेखील पाहा - 

द फिफ्थ एलिमेंट (१९९७)
प्रोमेथिअस (२०१२)
गार्डियन आॅफ द गॅलक्सी (२०१३)
ब्लेड रनर (१९८२)
सनशाईन (२००७)
वॉल ई (२००८)
स्टार ट्रेक (२००९)
सिरेनिटी (२००५)
द मार्शियन (२०१५)
इंटरस्टेलर (२०१४)

Web Title: Star Wars Fever: You see these 'Space Movies'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.