स्टार वार्स फेम कॅरी फिशरची मुत्यूशी झुंज अखेर अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2016 20:28 IST2016-12-28T20:19:08+5:302016-12-28T20:28:01+5:30

हॉलिवूड अभिनेत्री कॅरी फिशर (६०) हिची मृत्यूशी झुंज गेल्या मंगळवारी अपयशी ठरली. स्टार वार्स या चित्रपटात प्रिन्सेस लियाची भूमिका ...

Star Wars Fame Carry Fisher completes a battle with Mutushi | स्टार वार्स फेम कॅरी फिशरची मुत्यूशी झुंज अखेर अपयशी

स्टार वार्स फेम कॅरी फिशरची मुत्यूशी झुंज अखेर अपयशी

लिवूड अभिनेत्री कॅरी फिशर (६०) हिची मृत्यूशी झुंज गेल्या मंगळवारी अपयशी ठरली. स्टार वार्स या चित्रपटात प्रिन्सेस लियाची भूमिका साकारणाºया कॅरीला २३ डिसेंबर रोजी विमानाच्या लॅण्डिंगवेळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. तेव्हापासून ती यूसीएलए मेडिका सेंटर येथे आयसीयूमध्ये उपचार घेत होती. 



कॅरी फिशर आपल्या बोल्ड आणि बिंदास अंदाजासाठी ओळखली जात होती
‘टेलिग्राफ डॉट कॉ डॉट यूके’ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार कॅरीच्या निधनाच्या वृत्तास तिच्या मुलीने दुजोरा दिला आहे. २३ डिसेंबर रोजी आपल्या नव्या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी कॅरी लंडनहून लॉस एंजेलिस येथे जात होती. विमान लॅण्डिंग करीत असण्याच्या १५ मिनिटे अगोदर तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. यामुळे तिला तातडीने आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. ऐन ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागल्याने तिची आई अभिनेत्री डेबी रेनॉल्ड्स आणि तिचे जवळचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये तिच्याजवळ होते. 



लेखिका म्हणूनही कॅरीने ओळख निर्माण केली होती
तिची प्रकृती सातत्याने खालावत असल्याने सगळ्यांकडून चिंता व्यक्त केली जात होती. अखेर गेल्या मंगळवारी तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेत या जगाचा निरोप घेतला. कॅरीच्या परिवाराच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्हाला सांगण्यास अत्यंत वाईट वाटत आहे की, कॅरी आपल्यात नाही. कॅरीच्या निधनास तिची मुलगी बिली लाउर्ड हिने दुजोरा दिला असून, आम्ही सगळेच तिच्यावर आजही प्रेम करीत आहोत. तिच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी तिच्या फॅन्सकडून केल्या जात असलेल्या प्रार्थनेसाठी आम्ही ऋणी आहोत असेही तिने सांगितले. 



स्टार वार्सच्या आठव्या सीरिजमध्ये तिने प्रिसेंजची भूमिका साकारली होती
तर कॅरी फिशर हिची आई रेनॉल्डस (८४) हिने म्हटले की, माझी मुलगी प्रतिभावान होती. तिने स्वत:च्या हिमतीवर नाव कमावले होते. तिच्यावर आम्ही कायम प्रेम करणार आहोत. ती आमच्यात नाही याविषयी आमचा विश्वासच बसत नसल्याचेही रेनॉल्डस यांनी सांगितले.

Web Title: Star Wars Fame Carry Fisher completes a battle with Mutushi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.