स्टेलॉन आत्महत्त्या करण्याचा तर विचार करत नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 17:10 IST2016-12-20T16:57:37+5:302016-12-20T17:10:27+5:30

काही आठवड्यांपूर्वी फेसबुकवर फिरत असलेली एक पोस्ट कदाचित तुम्ही वाचली असेल. त्यामध्ये म्हटले होते की, ‘सीएनएन’चा एक रिपोर्ट नुकताच ...

Stallone does not think of committing suicide? | स्टेलॉन आत्महत्त्या करण्याचा तर विचार करत नाही ना?

स्टेलॉन आत्महत्त्या करण्याचा तर विचार करत नाही ना?

ही आठवड्यांपूर्वी फेसबुकवर फिरत असलेली एक पोस्ट कदाचित तुम्ही वाचली असेल. त्यामध्ये म्हटले होते की, ‘सीएनएन’चा एक रिपोर्ट नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून, ज्यात अभिनेता सिल्वेस्टर स्टेलॉन याच्या मृत्यूचा दावा करण्यात आला आहे. स्टेलॉनने आत्महत्त्या केली असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले होते. विशेष म्हणते त्यात स्टेलॉनच्या डेडबॉडीचा एक फोटोही शेअर करण्यात आला होता. मात्र काही काळानंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले, परंतु जेव्हा काही लोकांनी सीएनएनच्या या रिपोर्टच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्टेलॉन स्वत:ला संपविण्यासाठी प्लॅन करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 



अपघातात अभिनेता सिल्वेस्टर स्टेलॉनचा मृत्यू झाल्याची अफवा पसरविण्यात आली होती
फेसबुकवर फिरत असलेल्या या पोस्टमध्ये सीएनएनच्या रिपोर्टचा उल्लेख केला असल्याने माहिती आल्याने खरीच असेल असा विचार करून त्याचे फॅन्स आपल्या रेम्बो स्टार्ससाठी दु:खात बुडाले होते, परंतु ही बातमी चुकीची असल्याचे खुलासा करण्यात आल्यानंतर, त्याच्या फॅन्सला काहीसा दिला मिळाला. काहींनी या बातमीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला असता, त्यात तो सुखरूप असल्याचे समोर आला आहे. मात्र त्याचबरोबर तो आत्महत्त्या करण्यासाठी प्रयत्न असल्यानेच अशाप्रकारचा रिपोर्ट प्रसिद्ध केला असल्याची माहिती समोर आल्याने तो स्वत:ला संपविण्याचा का विचार करीत असावा, असा प्रश्न आता त्यांच्या फॅन्ससमोर निर्माण झाला आहे. 


सिल्वेस्टर स्टेलॉन सुखरूप असल्याचा असा खुलासा करण्यात आला
खरं तर सोशल मीडियावर एखाद्या स्टार्सच्या निधनाची बातमी व्हायरल होणे हे काही पहिल्यांदाच घडले नाही. यापूर्वीदेखील अनेक कलाकारांच्या निधनाच्या बातम्या व्हायरल करून श्रद्धांजलीपर मॅसेजनी धुमाकूळ घातला आहे. या अगोदर मायली सायरस, जेडन स्मिथ, अ‍ॅँजेलिना जोली यांच्यासह इंग्लंडची महाराणी यांनादेखील या अफवांना बळी पडावे लागले. असो स्टेलॉनच्या बातमीचा उलगडा झाल्यानंतर त्याच्या फॅन्समध्ये आनंद असला तरी, तो दु:खी असल्याच्या विचाराने त्याच्या फॅन्सच्या चिंतेत भर पडली आहे.  

Web Title: Stallone does not think of committing suicide?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.