​स्पायडरमॅन होमकमिंगचा ट्रेलर आता मराठीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2017 17:22 IST2017-03-27T09:30:24+5:302017-03-27T17:22:23+5:30

कोणत्याही चित्रपटाचा ट्रेलर विविध 10 भाषांमध्ये लाँच व्हायची ही पहिलीच वेळ आहे. स्पायडरमॅन होमकमिंग या चित्रपटाचा टीझर काही महिन्यांपूर्वी ...

Spiderman Homecoming Trailer Now in Marathi | ​स्पायडरमॅन होमकमिंगचा ट्रेलर आता मराठीत

​स्पायडरमॅन होमकमिंगचा ट्रेलर आता मराठीत

णत्याही चित्रपटाचा ट्रेलर विविध 10 भाषांमध्ये लाँच व्हायची ही पहिलीच वेळ आहे. स्पायडरमॅन होमकमिंग या चित्रपटाचा टीझर काही महिन्यांपूर्वी लाँच करण्यात आला होता. त्यापासून या चित्रपटाविषयी लोकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. प्रेक्षक त्यांच्या सुपर हिरोची गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहात आहेत.
स्पायडरमॅन गेल्या अनेक वर्षांपासून लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. त्यामुळे स्पायडरमॅन सिरिजमधील चित्रपटांची प्रेक्षक नेहमीच आतुरतेने वाट पाहात असतात. स्पायडरमॅनचे सगळेच भाग आतापर्यंत सगळ्या देशात हिट झाले आहेत. 
या चित्रपटाचे याआधीचे सगळेच भाग भारतातील लोकांनीदेखील डोक्यावर घेतले आहेत. स्पायडरमॅन लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचा प्रचंड लाडका आहे. आपल्या आवडत्या सुपरमॅनला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोनी पिक्चर्स एन्टरटेन्मेंटने एक छान युक्ती शोधून काढली आहे. 
स्पायडरमॅन होमकमिंग या चित्रपटाचा ट्रेलर भारतातील दहा भाषेत लाँच केला जाणार असून एकाचवेळी दहा भाषांमध्ये कोणत्याही चित्रपटाचा ट्रेलर लाँच व्हायची जगातली ही पहिलीच वेळ आहे. भारतातील हिंदी, तामिळ, तेलगू, गुजराती, मल्याळम, पंजाबी, भोजपूरी, कन्नड, बंगाली आणि मराठी भाषेत हा ट्रेलर लाँच होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांचा लाडला स्पायडरमॅन त्यांच्या भाषेत बोलताना पाहायला मिळणार आहे. स्पायडरमॅन आता मराठीतदेखील बोलणार आहे. त्यासोबत चित्रपटाचे पोस्टरदेखील या सगळ्या भाषांमध्ये बनवण्याचा विचार सुरू आहे. हा चित्रपट इंग्रजी, तामिळ, हिंदी, तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात स्पायडरमॅनची भूमिका टॉम हॉलंड साकारणार असून 20 वर्षीय अभिनेत्याचा हा पहिलाच चित्रपट आहे. स्पायडरमॅनच्या इतर भागांप्रमाणे हा भागदेखील बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरणार यात काही शंकाच नाही.  

Web Title: Spiderman Homecoming Trailer Now in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.