स्पायडर मॅनचा ड्रेस खूपच त्रासदायक : टॉम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2016 15:24 IST2016-10-18T15:24:46+5:302016-10-18T15:24:46+5:30

मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स फिल्म्सचा काल्पनिक सुपरहिरो, स्पायडर मॅनची भूमिका साकारणारा अभिनेता टॉम हॉलेंडला कधी-कधी स्पायडर मॅनचा ड्रेस खूपच त्रासदायक ...

Spider man's dress is so annoying: Tom | स्पायडर मॅनचा ड्रेस खूपच त्रासदायक : टॉम

स्पायडर मॅनचा ड्रेस खूपच त्रासदायक : टॉम

र्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स फिल्म्सचा काल्पनिक सुपरहिरो, स्पायडर मॅनची भूमिका साकारणारा अभिनेता टॉम हॉलेंडला कधी-कधी स्पायडर मॅनचा ड्रेस खूपच त्रासदायक वाटतो. मात्र पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेला स्पायडर मॅन साकारण्याची संधी मिळाल्यामुळे तो स्वत:ला भाग्यशालीही समजतो. 
एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार न्यूयॉर्क फिल्मोत्सवमध्ये गेल्या शनिवारी ‘द लॉस्ट सिटी आॅफ जेड’च्या प्रीमियरप्रसंगी बोलताना त्याने सांगितले की, स्पायडर मॅनचा ड्रेस घालणे सुरुवातीला फारच मजेशीर वाटत होते. नंतर तो फारच त्रासदायक वाटायला लागला.  आपण स्पायडर मॅनची भूमिका साकारत असल्याचा जेव्हा विचार मनात येत होता, तेव्हा मात्र मी स्वत:ला भाग्यशाली समजत होतो. कारण हा ड्रेस घालण्यासाठी हॉलिवूडमध्ये कलाकारांची अक्षरश: रिघ लागलेली आहे. त्यामुळे कितीही त्रास झाला तरी, मी ही भूमिका करतो.  
पुढच्या उन्हाळ्यात प्रदर्शित होणाºया ‘स्पायडर मॅन : होमकमिंग’ मध्ये टॉम स्पायडर मॅनची भूमिका साकारत आहे. चित्रपटात त्याने जबरदस्त स्टंट केले आहेत. यातील काही स्टंट बेकायदेशीर ठरविले अ्राहेत. याबाबत टॉमने सांगितले की, काही स्टंट खूपच प्रभावित करणारे होते. चित्रपटाची संपूर्ण टीम खूपच मदत करणारी असल्याने मला बरेच काही शिकायला मिळाले. टॉमने या वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या ‘कॅप्टन अमेरिका : सिव्हिल वॉर’ मध्ये स्पायडर मॅनची भूमिका साकारली होती. 

Web Title: Spider man's dress is so annoying: Tom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.