जेम्स बॉँड सर रॉजर मूर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2017 19:51 IST2017-05-23T14:00:53+5:302017-05-23T19:51:59+5:30
हॉलिवूडमधील सर्वाधिक हिट सिरीज असलेल्या ‘जेम्स बॉँड’पटात जेम्स बॉँडची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते रॉजर मूर यांचे वयाच्या ८९ व्या ...

जेम्स बॉँड सर रॉजर मूर यांचे निधन
ह लिवूडमधील सर्वाधिक हिट सिरीज असलेल्या ‘जेम्स बॉँड’पटात जेम्स बॉँडची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते रॉजर मूर यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाने ग्रस्त होते. स्विर्त्झलॅण्ड येथे त्यांचे निधन झाले. त्यांना त्यांच्या खºया नावापेक्षा जेम्स बॉँड नावानेच अधिक ओळखले जात असे. दरम्यान रोजर मूर यांच्या निधनाच्या वृत्तास त्यांच्या परिवाराकडून दूजोरा देण्यात आला आहे.
![]()
रॉजर यांनी ‘दि स्पाई हू लव्ह मी’ आणि ‘लिव अॅण्ड लेड डाई’ यासारख्या सुपरहिट बॉँडपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली. १९७३ ते १९८५ या काळात त्यांनी जेम्स बॉँडच्या विविध भूमिका साकारल्या. रॉजर यांच्या यशाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे जेम्स बॉँडची अतिशय खुबीने भूमिका साकारणाºया अभिनेता शॉँ कोनरी यांच्याकडून त्यांनी जेम्स बॉँडची भूमिका स्विकारली होती. शिवाय त्या भूमिकेस न्यायही दिला.
![]()
रॉजर यांनी जेम्स बॉँड व्यतिरिक्त गुप्तहेर या संकल्पनेवर आधारित असलेल्या प्रसिद्धी टीव्ही सिरीज ‘दि सेंट’ यामध्येही काम केले. या सिरीजमधील त्यांचा ‘सायमन टेंपलर’ ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. रॉजर मूर यांच्या परिवाराकडून ट्विटरवर याबाबतची एका पत्राद्वारे अधिकृत घोषणा करताच सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
}}}} ">With the heaviest of hearts, we must share the awful news that our father, Sir Roger Moore, passed away today. We are all devastated. pic.twitter.com/6dhiA6dnVg— Sir Roger Moore (@sirrogermoore) May 23, 2017१९२७ मध्ये लंडन येथे जन्मलेल्या रॉजर मूर यांनी ५० च्या दशकात मॉडेल म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी चित्रपटात नशीब आजमावले. पुढे त्यांना जेम्स बॉँड सिरीजमध्ये संधी मिळाल्याने ते रातोरात प्रसिद्धीझोतात आले. त्यानंतर त्यांनी लागोपाठ सात वेळा जेम्ब बॉँडची भूमिका साकारली. जेम्स बॉँड सिरीजमध्ये काम करणारे ते तिसरे अभिनेते होते. या अगोदर शॉन कॉन्ड्री आणि जॉर्ज लेजेन यांनी बॉन्डची भूमिका साकारली होती.
With the heaviest of hearts, we must share the awful news that our father, Sir Roger Moore, passed away today. We are all devastated. pic.twitter.com/6dhiA6dnVg— Sir Roger Moore (@sirrogermoore) May 23, 2017