Shocking : या रिअ‍ॅलिटी शोमध्ये कपल उतरवतात चक्क एकमेकांचे कपडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2017 22:51 IST2017-01-21T17:15:55+5:302017-01-21T22:51:42+5:30

एका विदेशी रिअ‍ॅलिटी शोमध्ये तर चक्क कपलला एकमेकांचे कपडे उतरविण्यास सांगितले जाते. पूर्णत: न्यूड होऊन त्यांना कॅमेºयाच्या समोरच वावरावे लागत असल्याने हा शो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Shocking: On the reality show, couples wearing each other clothes | Shocking : या रिअ‍ॅलिटी शोमध्ये कपल उतरवतात चक्क एकमेकांचे कपडे

Shocking : या रिअ‍ॅलिटी शोमध्ये कपल उतरवतात चक्क एकमेकांचे कपडे

्या रिअ‍ॅलिटी शोचा जमाना अजून, वेगवेगळ्या प्रकारच्या रिअ‍ॅलिटी शोची निर्मिती केली जात आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकही अशा शोला तुफान प्रतिसाद देत असल्याने हटक्या विषयांवर आधारित शोंची निर्मिती करून टीआरपीचा खेळ खेळला जात आहे. एका विदेशी रिअ‍ॅलिटी शोमध्ये तर चक्क कपलला एकमेकांचे कपडे उतरविण्यास सांगितले जाते. पूर्णत: न्यूड होऊन त्यांना कॅमेºयाच्या समोरच वावरावे लागत असल्याने हा शो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 



आॅस्ट्रेलियात अशाप्रकारचा शो नुकताच सुरू करण्यात आला असून, त्यामध्ये ज्या काही लीला दाखविल्या जातात, त्या दंग करणाºया आहेत. आॅस्ट्रेलियाच्या ‘एसबीएस’ या टीव्ही चॅनेलवर प्रसारित होणारा हा टीव्ही शो सध्या चर्चेचा विषय ठरला असून, शोचे नावच ‘अनड्रेस्ड’ असे ठेवण्यात आले आहे. 



शोमध्ये अनोळखी कपलला एकमेकांचे कपडे उतरविण्यास सांगितले जात असून, त्यांना कॅमेºयासमोर न्यूड व्हावे लागते. विशेष म्हणजे या शोला एवढे काही पसंत केले जात आहे की, शोमध्ये सहभागी होण्यासाठी तरुणांच्या अक्षरश: रांगा लागत आहेत. शोच्या प्रसिद्ध झालेल्या काही एपिसोडनुसार, दोन अनोळखी व्यक्तींना एका खोलीत पाठविले जाते. त्यानंतर त्यांना एकमेकांचे कपडे उतरविण्यास सांगितले जाते. तब्बल अर्धातास त्यांना न्यूड स्थितीत कॅमेºयासमोर फिरावे लागते. त्यानंतर बाजूला असलेल्या बेडवर त्यांना झोपून एकमेकांशी संवाद साधावा लागतो. तसेच शोच्या टीमकडून त्यांना काही इंटिमेट प्रश्नही विचारले जातात. 



शोचे दिग्दर्शक मार्शल हेल्ड यांच्या मते, या रिअ‍ॅलिटी शोला जबरदस्त पसंत केले जात असून, टीआरपीचे सर्व रेकॉर्ड शोने ब्रेक केले आहेत. या शो ‘फनी’ कॅटेगिरीत असल्याने लोक एन्जॉय करीत आहेत. शोमधून कुठल्याही प्रकारचा चुकीचा संदेश दिला जात नाही. लोक या शोला आवडीने बघत असून, शोप्रती कोणीही तक्रार करण्याच्या मन:स्थितीत नाही. 

Web Title: Shocking: On the reality show, couples wearing each other clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.