Shocking : किम कार्दशियननंतर ‘या’ अभिनेत्रीलाही चोरट्यांनी लुटले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2017 14:19 IST2017-03-19T08:49:38+5:302017-03-19T14:19:38+5:30

काही दिवसांपूर्वी रिअ‍ॅलिटी टीव्हीस्टार किम कार्दशियन हिला काही चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आता ...

Shocking: Kim Kardashian robbed the actress' s thief too! | Shocking : किम कार्दशियननंतर ‘या’ अभिनेत्रीलाही चोरट्यांनी लुटले!

Shocking : किम कार्दशियननंतर ‘या’ अभिनेत्रीलाही चोरट्यांनी लुटले!

ही दिवसांपूर्वी रिअ‍ॅलिटी टीव्हीस्टार किम कार्दशियन हिला काही चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आता तिची बहीण आणि हॉलिवूड अभिनेत्री केंडर जेनर हिच्या घरीही चोरीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. 

किमच्या बाबतीत घडलेल्या घटनेनंतर ती प्रचंड घाबरून गेली होती. किमचा पती कान्ये वेस्ट हिने तिच्या सुरक्षेत वाढ करीत तिला सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावण्यास सक्त मनाई केली होती. शिवाय किमदेखील या घटनेतून बराच काळ सावरली नव्हती. आता तिची लहान बहीण केंडल हिच्याबाबतही असाच काहीसा प्रसंग समोर आला आहे. केंडलच्या घरातून सुमारे २ लाख डॉलर म्हणजेच जवळपास १ कोटी ३१ लाख रुपयांची ज्वेलरी चोरीला गेली आहे. 



या घटनेनंतर केंडलने लगेचच पोलिसांत तक्रार दिली असून, सध्या पोलीस याप्रकरणी तपास करीत आहे. मात्र चोरट्यांनी कुठल्याही प्रकारचे पुरावे ठेवले नसल्याने त्यांचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. खरं तर ज्यावेळेस ही घटना घडली तेव्हा केंडल घरातच होती. चोरट्यांचा आवाज तिच्या कानावर पडल्यानंतर तिला याबाबतचा अंदाजही आला होता. यावेळी तिने लगेचच पोलिसांना फोन केला होता. मात्र जोपर्यंत पोलीस घटनास्थळी पोहचले तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा त्यांना कुठल्याही प्रकारचे पुरावे आढळून आले नाहीत. 

पाच महिन्यांपूर्वी पॅरिस येथे किमसोबत घडलेल्या घटनेचादेखील पोलीस अद्यापपर्यंत तपास करीत आहे. चोरट्यांनी किमला गन प्वॉइंटवर दम देत लुटले होते. परंतु अद्यापपर्यंत पोलीस या प्रकरणातील गुन्हेगारांना पकडू शकले नाहीत. त्यामुळे केंडलच्या घरात घडलेल्या या लुटमारीच्या प्रकरणात पोलीस कशा पद्धतीने तपासाची चक्रे फिरवणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. 

Web Title: Shocking: Kim Kardashian robbed the actress' s thief too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.