सेलेना गोमेजचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक; एक्स बॉयफ्रेंड जस्टिन बीबरचा न्यूड फोटो केला पोस्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 17:15 IST2017-08-29T11:45:30+5:302017-08-29T17:15:49+5:30
हॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका सेलेना गोमेज हिचे इन्स्टाग्राम अकाउंट अॅक झाल्याचे समोर येत आहे. तिचे अकाउंट हॅक झाल्याची माहिती तेव्हा समोर आली जेव्हा तिच्या अकाउंटवर एक्स बॉयफ्रेंड जस्टिन बीबरचा न्यूड फोटो अपलोड करण्यात आला.
सेलेना गोमेजचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक; एक्स बॉयफ्रेंड जस्टिन बीबरचा न्यूड फोटो केला पोस्ट!
क ही दिवसांपूर्वीच अभिनेत्री राधिका आपटे हिचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची बातमी समोर आली होती. आता हॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका सेलेना गोमेज हिचे इन्स्टाग्राम अकाउंट अॅक झाल्याचे समोर येत आहे. तिचे अकाउंट हॅक झाल्याची माहिती तेव्हा समोर आली जेव्हा तिच्या अकाउंटवर एक्स बॉयफ्रेंड जस्टिन बीबरचा न्यूड फोटो अपलोड करण्यात आला.
या व्यतिरिक्त तिच्या अकाउंटवर इतरही काही फोटोज् शेअर करण्यात आले आहेत. त्यामध्ये जस्टिन आणि सेलेनाच्या २०१५ मधील व्हेकेशन दरम्यानच्या फोटोज्चा समावेश आहे. सेलेनाचे अकाउंट हॅक केल्यानंतर काही वेळातच हे फोटोज अपलोड करण्यात आले. मात्र सेलेनाच्या ही बाब वेळेत लक्षात आल्यानंतर तातडीने तिचे इन्स्टाग्राम अकाउंट काही तास बंद करण्यात आले. अकाउंटमधील काही वादग्रस्त फोटोज् काढून टाकल्यानंतर पुन्हा सेलेनाचे अकाउंट सुरू करण्यात आले.
सेलेनाला इन्स्टावर १२ कोटी पाच लाख युजर्स फॉलो करतात. तिने आतापर्यंत सुमारे एक हजार ५३८ फोटोज् इन्स्टावर पोस्ट केले आहेत. सेलेना आणि जस्टिन यांच्यातील नात्याविषयी सांगायचे झाल्यास, या दोघांनी २०११ मध्ये त्यांच्यातील नात्याचा उलगडा केला होता. मात्र पुढे काही वर्षांनंतरच त्यांच्यात ब्रेकअप झाले.
काही दिवसांपूर्वीच ‘पार्च्ड’ स्टार राधिका आपटे हिचे सोशल अकाउंट हॅक झाले होते. यावेळी राधिकाने तिच्या ट्विटर हॅण्डलवरून एक ट्विट करीत ‘माझ्या फेसबुक अकाउंटवर कोणीही मॅसेज करू नका’ असा संदेश दिला होता. सध्या राधिका अभिनेता सैफ अली खान याच्याबरोबर काम करीत आहे. लवकरच ती ‘बाजार’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहे.