सेलेनाला या सेलिब्रिटीचे तोंडही बघायाचे नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 16:34 IST2016-12-22T16:34:33+5:302016-12-22T16:34:33+5:30

एकेकाळच्या जीवलग मैत्रिण असलेल्या गायिका सेलेना गोमेज आणि टेलर स्विफ्ट यांच्यात सध्या जबरदस्त वैर निर्माण झाले आहे. सेलेनाला तर ...

Selena does not even have to face the celebrity's face | सेलेनाला या सेलिब्रिटीचे तोंडही बघायाचे नाही

सेलेनाला या सेलिब्रिटीचे तोंडही बघायाचे नाही

ेकाळच्या जीवलग मैत्रिण असलेल्या गायिका सेलेना गोमेज आणि टेलर स्विफ्ट यांच्यात सध्या जबरदस्त वैर निर्माण झाले आहे. सेलेनाला तर तिचे तोंडही बघण्याची इच्छा नसल्याचे तिने जाहीरपणे सांगितले आहे. 

पुनर्वसन केंद्रातून परतल्यानंतर सेलेनाने टेलर स्विफ्टबरोबरची मैत्री संपल्याचे स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून स्विफ्ट आणि सेलेनामध्ये जबरदस्त वाद सुरू होता. यातूनच सेलेनाला तिच्या सहकलाकारांनी तिच्यासोबतची मैत्री तोडण्याचा सल्लाही दिला होता. काही महिने पुनर्वसन केंद्रात राहिल्यानंतर सेलेनाने तिच्याशी मैत्री तोडण्याचा निर्णय घेताना स्विफ्टचे तोंड बघणे पसंत नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

रडार आॅनलाइन डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, दोघींमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून मैत्री होती. मात्र पुनर्वसन केंद्रातून बाहेर पडल्यानंतर दोघींमध्ये कटूता निर्माण झाली. आता ही कटूता वैर बनल्याने दोघीही एकमेकींचे नाव घेतल्यास संतापतात. 

एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पुनर्वसन केंद्रातून बाहेर आल्यानंतर सेलेनाने आपल्या आयुष्यावर वाईट प्रभाव टाकणाºया व्यक्तींपासून दूर राहण्याचे ठरविले आहे. ज्यात टेलर स्विफ्टचे नाव अग्रस्थानी आहे. खरं तर स्विफ्ट सुरुवातीपासूनच सेलेनाच्या तुलनेत आघाडी घेत आली आहे. दोघींच्या करिअरचा आलेख बघितल्यास त्यामध्ये स्विफ्टने भरारी घेतल्याचे दिसून येते. त्यामुळेच सेलेना आणि स्विफ्ट यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कटूता निर्माण झाली होती. 

हॅँड्स टू मायसेल्फची गायिका असलेली सेलेना आता तिच्या सभोवताली सकारात्मक वातावरण ठेवू इच्छिते. त्यामुळेच तिने स्विफ्टबरोबरचे सर्व नाते तोडले आहेत. 



सेलेना गोमेज आणि टेलर स्विफ्ट

Web Title: Selena does not even have to face the celebrity's face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.