See Pics : कान्सच्या रेड कार्पेटवर उप्स मोमेंटला बळी पडली बेला हदीद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2017 20:59 IST2017-05-18T15:22:22+5:302017-05-18T20:59:57+5:30

७०व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुन्हा एकदा मॉडेल बेला हदीद हिला रेड कार्पेटवर उप्स मोमेंटचा सामना करावा लागला. जेव्हा बेला ...

See Pics: Bela Hadid victims of Ups Moment at Cannes red carpet! | See Pics : कान्सच्या रेड कार्पेटवर उप्स मोमेंटला बळी पडली बेला हदीद!

See Pics : कान्सच्या रेड कार्पेटवर उप्स मोमेंटला बळी पडली बेला हदीद!

व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुन्हा एकदा मॉडेल बेला हदीद हिला रेड कार्पेटवर उप्स मोमेंटचा सामना करावा लागला. जेव्हा बेला रेड कार्पेटवर लाइट पिंक गाउन घालून पोहोचली होती तेव्हा छायाचित्रकारांना पोज देताना तिचा गाउन शरीरावरून खाली घसरत असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने तातडीने सावरासावर करीत ती पुन्हा तेवढ्याच आत्मविश्वासाने छायाचित्रकारांना सामोरे गेले. 







७० व्या कान्सच्या रेड कार्पेटवर सध्या जगभरातील सौंदर्य अवतरल्याने जणू काही अप्सराच जमिनीवर आल्याचे दिसत आहे. मॉडेल बेला हदीददेखील अशाच काहीशा अंदाजात रेड कार्पेटवर उतरली होती. बेलाचे सौंदर्य बघून शेकडोच्या संख्येने कॅमेरे तिच्या दिशेने वळले. यावेळी बेलाने अ‍ॅलेक्झेड्रा व्हेदूअर याने डिझायन केलेला स्ट्रॅपलेस गाउन घातला होता. या गाउनमध्ये बेला तिचे सेक्सी पाय प्लान्ट करताना दिसून आली. 







काही वेळानंतर हा गाउन तिच्या शरीरावरून खाली घसरत असल्याचे तिच्या लक्षात आले. असे पहिल्यांदाच घडले की, एखाद्या सुपरमॉडेलची न्यूड अंडरवियर दिसली अन् ती वार्डरोब माल्फंक्शनची बळी ठरली. बेलाने या ड्रेसवर ओल्गाना पॅरिसचे सॅण्डल घातलेले होते.







गेल्या वर्षीच्या कान्समध्येही बेला हदीदला उप्स मोमेंटचा सामना करावा लागला होता. 

तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, बेलाचे वय केवळ २० वर्षे आहे. रेड कार्पेटवर बेला तिच्या वडिलांसोबत बघावयास मिळाली. गेल्यावर्षीदेखील बेला कान्समध्ये सहभागी झाली होती. त्यावेळीदेखील तिला उप्स मोमेंटचा सामना करावा लागला होता. परंतु यामुळे बेलामधील आत्मविश्वास किंचितही खसलेला दिसला नाही. तिने स्वत:ला सावरत आपल्या सौंदर्याची जादू सर्वदूर पसरविली. 

Web Title: See Pics: Bela Hadid victims of Ups Moment at Cannes red carpet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.