SEE PIC : किम कर्दाशियनने झाडावर चढून केले न्यूड फोटोशूट, नेटिझन्सचा झाला संताप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 22:02 IST2017-09-06T10:47:34+5:302017-09-06T22:02:59+5:30

किम नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. आता तिने असेच काहीसे फोटोशूट केल्याने, सोशल मीडियावर ती वादग्रस्त ठरत आहे.

SEE PIC: Kim Kardashian climbed to the tree Nude photoshoot, Netizens became angry! | SEE PIC : किम कर्दाशियनने झाडावर चढून केले न्यूड फोटोशूट, नेटिझन्सचा झाला संताप!

SEE PIC : किम कर्दाशियनने झाडावर चढून केले न्यूड फोटोशूट, नेटिझन्सचा झाला संताप!

ल्या बोल्डनेसमुळे हॉलिवूडमध्येच नव्हे तर जगभरात चाहत्यांच्या मनात बसलेली रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार किम कर्दाशियन सध्या पुन्हा एकदा तिच्या बोल्ड कारणामुळेच चर्चेत आली आहे. किमने नुकतेच एका साप्ताहिकासाठी फोटोशूट केले असून, यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण हे फोटोशूट प्रचंड बोल्ड असून, ज्यामध्ये किम कपडे न घालताच ती एका झाडावर चढून फोटो काढताना दिसत आहे. किमने तिच्या या न्यूड फोटोशूटमध्ये केवळ पायात बुट्स घातलेले आहेत. किमने तिचा हा फोटो सोशल अकाउंट इन्स्टाग्रामवर शेअर केल्याने चाहत्यांकडून त्यास चांगल्या वाईट प्रतिक्रिया मिळत आहेत. अर्थातच यात वाईट प्रतिक्रियांचा अधिक समावेश आहे. 
 

किमच्या इन्स्टाग्राम पेजवर तिच्या या फोटोवर अनेकांनी कॉमेण्ट केल्या. त्यामध्ये निगेटिव्ह कॉमेण्ट्सचा अधिक समावेश आहे. एका यूजर्सने लिहिले की, ‘आता हे काय नवीन, झाडावरून खाली उतर आणि कपडे घाल, जॅकीचे फोटोशूट खूपच क्लासी आणि सुंदर असायचे हे तर पोर्न आहेत.’ या फोटोशूटसाठी किमने प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर मार्ट आणि मर्कस यांच्यासोबत काम केले आहे. किमचा हा फोटो मार्टनेही शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘नाइट बर्ड’ त्याचबरोबर त्याने किमला ‘ट्रु ब्यूटी’ असेही संबोधले आहे. 






त्याचबरोबर किम या फोटोशूटमुळे ट्विटरवरही ट्रोल होत आहे. कारण बºयाच लोकांनी तिच्यावर व्यंगात्मक पद्धतीने टीका केली आहे. काहींनी तर चक्क तिला हत्तीबरोबर कम्पेअर केले आहे. काहींनी किमच्या फोटोच्या चांगल्याही प्रतिक्रिया दिल्या आहेत. असो, किम नेहमीच तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. यावेळेस देखील तिने असेच काहीसे फोटोशूट करून धूम उडवून दिली आहे. 

Web Title: SEE PIC: Kim Kardashian climbed to the tree Nude photoshoot, Netizens became angry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.