SEE PIC : जस्टिन बीबर अडकला ब्राझिलियन मॉडेलच्या प्रेमात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2017 22:11 IST2017-04-02T16:41:57+5:302017-04-02T22:11:57+5:30

गायक जस्टिन बीबर त्याच्या गायिकेपेक्षा गर्लफ्रेण्डस्मुळेच अधिक चर्चेत असतो. सध्या त्याचा असाच एक ब्राझिलियन मॉडेलबरोबरचा एक फोटो समोर आला ...

SEE PIC: Justin Bieber is in love with the Brazilian model? | SEE PIC : जस्टिन बीबर अडकला ब्राझिलियन मॉडेलच्या प्रेमात?

SEE PIC : जस्टिन बीबर अडकला ब्राझिलियन मॉडेलच्या प्रेमात?

यक जस्टिन बीबर त्याच्या गायिकेपेक्षा गर्लफ्रेण्डस्मुळेच अधिक चर्चेत असतो. सध्या त्याचा असाच एक ब्राझिलियन मॉडेलबरोबरचा एक फोटो समोर आला असून, ही त्याची नवी गर्लफ्रेण्ड तर नसावी ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण फोटोमध्ये जस्टिन खूपच रिलॅक्स दिसत असून, त्याच्या चेहºयावर स्माइल आहे. 



जस्टिन गायिका सेलिना गोमेज हिच्याबरोबरच्या प्रेमसंबंधांमुळे नेहमीच चर्चेत असतो, परंतु आता त्याचा मॉडेलबरोबरचा एक फोटो समोर आल्याने सेलिनासोबत त्याचे ब्रेकअप तर झाले नसावे ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. टीएमजेड डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, जस्टिनने मॉडेल लूसियाना चमोने हिच्याबरोबर बराच वेळ व्यतित केला. गेल्या गुरुवारी या दोघांनाही जस्टिनच्या कारच्या मागच्या सीटवर एकमेकांच्या गळ्यात हात टाकून जाताना बघण्यात आले होते. 



तर दुसरीकडे जयान मलिक हिच्याबरोबर एका नव्या सिंगल एल्बममध्ये जस्टिन काम करीत असल्याने त्यांच्यात काही तरी गुफ्तगू सुरू असल्याचे बोलले जात होते. जयान मलिकच्या ‘पार्टी नेक्स्ट डोर’ या अल्बमच्या लिंकला रिट्विट करताना आम्ही एकत्र काम करीत असल्याचे जस्टिनने स्पष्ट केले होते. तेव्हा या दोघांमध्ये काही तरी शिजत असल्याची चर्चा रंगली होती. मात्र आता ब्राझिलियन मॉडेलबरोबर जस्टिनचा फोटो समोर आल्याने जस्टिनची नेमकी गर्लफ्रेण्ड कोण, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 



जस्टिन मे महिन्यात भारतात येत आहे. मुंबई येथील डी. वाय. पाटील मैदानावर त्याच्या कॉन्सर्टचे आयोजन केले आहे. भारतातील त्याच्या फॅन्सला या कॉन्सर्टविषयी जबरदस्त उत्सुकता असून, त्याची तिकीटविक्री सध्या जोरात सुरू आहे. 

Web Title: SEE PIC: Justin Bieber is in love with the Brazilian model?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.