SEE Hot PIC : ...पुन्हा बिकिनी अवतारात दिसली प्रियंका चोपडा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2017 17:43 IST2017-05-16T12:05:03+5:302017-05-16T17:43:09+5:30

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा सध्या हॉलिवूडमध्ये चांगलीच रमली आहे. ‘क्वांटिको’ मालिकेत ब्रेक मिळालेल्या पीसीने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून ...

SEE Hot PIC: ... again seen in Bikini avatars Priyanka Chopda !! | SEE Hot PIC : ...पुन्हा बिकिनी अवतारात दिसली प्रियंका चोपडा!!

SEE Hot PIC : ...पुन्हा बिकिनी अवतारात दिसली प्रियंका चोपडा!!

लिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा सध्या हॉलिवूडमध्ये चांगलीच रमली आहे. ‘क्वांटिको’ मालिकेत ब्रेक मिळालेल्या पीसीने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून ‘बेवॉच’सारखा चित्रपट मिळवला. आता आणखी एका चित्रपटात ती झळकणार असल्याची नुकतीच बातमी समोर आली आहे. प्रियंकाने हॉलिवूडमध्ये आपला दबदबा निर्माण करताना संबंध हॉलिवूडकरांना आपल्या सौंदर्याची मोहिनी घातली आहे. सध्या प्रियंका मिआमी येथे असून, ती हॉलिडे मुडमध्ये दिसत आहे. कारण गेल्या दोन दिवसांत समोर आलेल्या प्रियंकाच्या बिकिनी फोटेज्नी सध्या सगळीकडे आग लावली आहे. 







गेल्या रविवारी प्रियंकाच्या ‘बेवॉच’ या पहिल्या-वहिल्या चित्रपटाचा प्रीमियर सोहळा पार पडला. सोहळ्यात प्रियंकाचा लुक बघण्यासारखा होता. निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आलेल्या प्रियंकाने उपस्थितांना घायाळ केले होते. चित्रपटातील मुख्य अभिनेता ड्वेन जॉनसन याने तर प्रियंकाला सर्वांसमक्ष कीस केले. ड्वेनची ही वर्तणूक बघून प्रियंकाही काहीकाळ चकीत झाली होती. प्रियंकाच्या सौंदर्याने अन् तिच्या उपस्थितीने प्रीमियर सोहळ्यात चार चॉँद लावले होते. 







प्रीमियर सोहळ्यानंतर प्रियंकाने आपल्या मित्रांबरोबर मदर्स डे स्पेंट करण्यासाठी बीचवर हजेरी लावली होती. यावेळी तिने येथे बिकिनीमध्ये क्वालिटी टाइम व्यतित केला. काही फोटोंमध्ये ती ड्रिंक करतानाही बघावयास मिळाली. गेल्या शनिवारी याच बिचवरील तिचे काही फोटोज् व्हायरल झाले होते. फोटोमध्ये प्रियंकाचा बिकिनी लुक घायाळ करणारा होता. हे फोटो काही क्षणातच इंटरनेटवर व्हायरल झाले होते. यावेळी प्रियंकासोबत ब्राजीलियन सुपरमॉडेल एड्रियाना लीमा होती. ब्लॅक बिकिनीमध्ये असलेली प्रियंका कमालीची सुंदर दिसत होती. ती एड्रियानासोबत मस्ती करताना दिसत होती.  







आता पुन्हा एकदा प्रियंकाचे असेच काहीसे बिकिनी फोटोज् समोर आले आहेत. आपल्या फ्रेण्डसर्कलसोबत ती बीचवर एन्जॉय करताना दिसत आहे. सध्या हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, प्रियंकाचा हा अवतार नेटिझन्सना चांगलाच भावत आहे. ‘दोस्ताना’ चित्रपटात प्रियंकाने दिलेला बिकिनी सीन्स याच बीचवर शूट करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा याच बिचवरील प्रियंकाचे फोटो व्हायरल होत असल्याने तिच्या चाहत्यांना प्रियंकाचा हा लुक खूपच भावत आहे. 






दरम्यान, प्रियंकाचा ‘बेवॉच’ हा चित्रपट १० मे रोजी फिलिपिंस येथे रिलीज करण्यात आला आहे, तर २५ मे रोजी संपूर्ण जगभर हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे. ड्वेन जॉनसनची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात प्रियंका निगेटिव्ह भूमिका साकारताना दिसणार आहे. आतापर्यंतच्या ट्रेलरमधून प्रियंकाने प्रेक्षकांवर मोहिनी घातली असून, हा चित्रपट करिष्मा करणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच. 

Web Title: SEE Hot PIC: ... again seen in Bikini avatars Priyanka Chopda !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.