सारा पॉलसनला पुन्हा सिरियल किलर फिल्मची आॅफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 21:49 IST2017-02-12T16:19:10+5:302017-02-12T21:49:10+5:30

अभिनेत्री सारा पॉलसन सध्या भलतीच खूश आहे. अर्थात त्यास कारणही तसेच आहे. तिला आगामी सिरियल किलर ड्रामा फिल्म ‘लॉस्ट ...

Sarah Paulson again returns to the serial killer film | सारा पॉलसनला पुन्हा सिरियल किलर फिल्मची आॅफर

सारा पॉलसनला पुन्हा सिरियल किलर फिल्मची आॅफर

िनेत्री सारा पॉलसन सध्या भलतीच खूश आहे. अर्थात त्यास कारणही तसेच आहे. तिला आगामी सिरियल किलर ड्रामा फिल्म ‘लॉस्ट गर्ल’मध्ये एका महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी आॅफर देण्यात आली आहे. या आॅफरमुळे सारा ‘सातवे आसमॉँ पे’ असून, हा सिनेमा तिच्या करिअरला कलाटणी देणारा ठरू शकतो. 

हॉलिवूड रिपोर्टर डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, शोध पत्रकार रॉबर्ट कॉळकर, डॉक्यूमेट्री निर्माता लिज गारबस हेदेखील या सिनेमात झळकण्याची शक्यता आहे. सिनेमाची कथा पत्रकार रॉबर्ट यांच्या ‘लॉस्ट र्ग्लस’ (२०१३) या पुस्तकावर आधारित आहे. सिनेमाची कता न्यूयॉर्कच्या एका भल्या मोठ्या आयलॅँडवर हरवलेल्या मुलाचा शोध घेणाºया आईच्या अवती-भोवती फिरणारी आहे. 

सारा पॉलसनला नुकतेच ‘द पीपुल वी. ओ. जे. सिम्पसन : अमेरिकन क्राइम स्टोरी’ या टीव्ही शोसाठी स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्ड अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. या शोमध्ये तिने साकारलेल्या मार्सिया क्लार्क नावाच्या भूमिका एमी आणि गोल्डन अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले आहे. आता तिला पुन्हा एका मोठ्या बॅनरच्या सिनेमाची आॅफर मिळाल्याने सारा खूश आहे. 

अभिनेत्री सारा पॉलसनला क्राइमशी संबंधित मालिका आणि सिनेमांमध्ये काम करण्यासाठी ओळखले जाते. तिने साकारलेल्या बºयाचशा भूमिकांना मानाच्या समजलेल्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. आता पुन्हा तिला अशाच एका सिरियल किलर ड्रामामध्ये काम करण्याची आॅफर मिळाल्याने ती खूश आहे. सूत्रानुसार तिने ही आॅफर स्वीकारली असून, लवकरच सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होण्याची शक्यता आहे.  

Web Title: Sarah Paulson again returns to the serial killer film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.