तरुणींना भावली फेलिसिटीची ही भूमिका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2016 19:24 IST2016-12-16T19:10:12+5:302016-12-16T19:24:03+5:30

‘रॉग वन : ए स्टार वार्स स्टोरी’ या चित्रपटातील जायन एर्सो ही भूमिका तरुणींना अधिक भावली असून, त्यास त्या ...

The role of felicity to the ladies! | तरुणींना भावली फेलिसिटीची ही भूमिका !

तरुणींना भावली फेलिसिटीची ही भूमिका !

ॉग वन : ए स्टार वार्स स्टोरी’ या चित्रपटातील जायन एर्सो ही भूमिका तरुणींना अधिक भावली असून, त्यास त्या स्वतंत्र, दमदार आणि आदर्श भूमिका असल्याचा दर्जा देत आहेत. तरुणींच्या या प्रतिक्रियेमुळे अभिनेत्री फेलिसिटी जोंस सध्या भारावून गेली आहे. 

‘रॉग वन : ए स्टार्स वार्स स्टोरी’ या चित्रपटात फेलिसिटी जोंस हिने जायन एर्सो ही भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या रिलिजनंतर प्रेक्षकांनी त्यातही तरुणींनी या भूमिकेचे जबरदस्त कौतुक केले आहे. काही तर या पात्राला आदर्श मानत आहेत. फेलिसिटीला याविषयीच्या प्रतिक्रिया मिळत असल्याने तिने तिच्या फॅन्सचे आभार मानताना मी खूपच आनंदी असल्याचे म्हटले आहे. 



‘रॉग वन : ए स्टार वार्स स्टोरी’ या चित्रपटात फेलिसिटी ‘जायन एर्सो’च्या भूमिकेत
एनवाय डेली न्यूज डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार फेलिसिटीने सांगितले की, माझ्यासाठी ही भूमिका साकारणे खरोखरच आव्हानात्मक होते. या भूमिकेला न्याय देण्यासाठी मी खूप मेहनत घेतली. आज तरुणींचा मला मिळत असलेला प्रतिसाद पाहता मी साकारलेल्या भूमिकेला न्याय देऊ शकले याचे समाधान वाटत आहे. 

फेलिसिटीच्या ‘स्टार वार्स द फॉर्स अवेकंस’ या चित्रपटातील डेजी रायडली या पात्रालादेखील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यावेळेसदेखील तिचे सर्वत्र कौतुक केले आहे. त्यामुळे फेलिसिटी तिच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करीत आहे. 



‘रॉग वन : ए स्टार वार्स स्टोरी’ या चित्रपटातील एक क्षण

Web Title: The role of felicity to the ladies!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.