रॉबर्ट डी नीरो यांना चॅपलिन पुरस्कार घोषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2016 15:31 IST2016-10-18T15:31:03+5:302016-10-18T15:31:03+5:30

फिल्म सोसायटी आॅफ लिंकन सेंटरने प्रसिद्ध अभिनेता रॉबर्ट डी नीरो यांना चॅपलिन पुुरस्कार घोषित केला. सूत्रानुसार, डी नीरो यांना ...

Robert De Niro announces the Chaplin Award | रॉबर्ट डी नीरो यांना चॅपलिन पुरस्कार घोषित

रॉबर्ट डी नीरो यांना चॅपलिन पुरस्कार घोषित

ल्म सोसायटी आॅफ लिंकन सेंटरने प्रसिद्ध अभिनेता रॉबर्ट डी नीरो यांना चॅपलिन पुुरस्कार घोषित केला. सूत्रानुसार, डी नीरो यांना त्यांच्या गेल्या चार दशकाच्या अभिनयासाठी २०१७ ची ट्राफी प्रदान केली जाणार आहे. 
डी नीरो ९/११ च्या दहशतवादी हल्लाचा विचार करून मॅनहट्टनमधील आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी लॉन्च केलेल्या ट्रिबेका फिल्म महोत्सवाचे सह-संस्थापक देखील आहेत. या फिल्म सोसायटीच्या माध्यमातून डी नीरो यांना नामांकित व्यक्तींच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या पुरस्कार समारंभात डी नीरो यांच्या करिअरच्या महत्त्वपूर्ण चित्रपटांची झलकही दाखविली जाणार आहे. चॅपलिन पुरस्कार सोहळ्याचे हे ४४ वे वर्ष आहे. हा सोहळा २०१७ मध्ये आयोजित केला जाईल. 

Web Title: Robert De Niro announces the Chaplin Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.