‘रेसिडेंट ईव्हिल’मुळेचे सुरू झाली दिग्दर्शक पॉल अँडरसन आणि मिला योवोव्हिचची प्रेमकहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2017 16:17 IST2017-01-29T10:47:00+5:302017-01-29T16:17:00+5:30

व्हिडिओ गेम्सवर आधारित चित्रपटांमध्ये ‘रेसिडेंट ईव्हिल’चे नाव सुपरिचित आहे. दिग्दर्शक पॉल अँडरसन आता या सिरीजमधील शेवटचा चित्रपट ‘रेसिडेंट ईव्हिल: ...

'Resident Evil' debuts with director Paul Anderson and Milwaukee's love story | ‘रेसिडेंट ईव्हिल’मुळेचे सुरू झाली दिग्दर्शक पॉल अँडरसन आणि मिला योवोव्हिचची प्रेमकहाणी

‘रेसिडेंट ईव्हिल’मुळेचे सुरू झाली दिग्दर्शक पॉल अँडरसन आणि मिला योवोव्हिचची प्रेमकहाणी

हिडिओ गेम्सवर आधारित चित्रपटांमध्ये ‘रेसिडेंट ईव्हिल’चे नाव सुपरिचित आहे. दिग्दर्शक पॉल अँडरसन आता या सिरीजमधील शेवटचा चित्रपट ‘रेसिडेंट ईव्हिल: द फायनल चाप्टर’ हा सिनेमा घेऊन येत आहे. गेली १५ वर्षे या चित्रपटांशी जुळलेला असताना नेमके काय मिळवले असे विचारले असता तो म्हणतो बायको मिळाली!

नाही कळाले ना? अहो, पॉल आणि सिनेमाची प्रमुख अभिनेत्री मिला योवोव्हिच हे पती-पत्नी असून या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान त्यांची भेट झाली होती. एकत्र काम करताना दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. नंतर त्यांनी लग्नसुद्धा केले. त्यांना एक मुलगी असून तीदेखील या सिरीजमध्ये काम करते.

ALSO READ: मिला योवोव्हिचला करायचेय सलमाना खानसोबत काम?

तो म्हणतो, ‘या चित्रपटांनी मला खूप काही दिले आहे. खासकरून माझ्या आयुष्यात मिलाचा प्रवेश या चित्रपटामुळेच तर झाला. आणि आता माझी मुलगीसुद्धा ‘रेसिडेंट ईव्हिल’मध्ये काम करत असल्यामुळे खूपच आनंद होतोय. एका अर्थाने संपूर्ण कुटुंबच ही सिरीज बनविण्यात सहभागी झाले आहे. आता शेवट होणार असल्यामुळे एक वेगळीच हुरहुर मनाला लागलेली आहे.’

Resident evil poster

सिक्वेल बनवण्याचा ट्रेंड पाहता पॉलवर त्याचा काही दबाव होता का? त्याला तरी नाही वाटत. तो म्हणतो, ‘दबाव वगैरे काही नव्हता. परंतु ‘अ‍ॅलाईस’ची कथा एका चांगल्या प्रकारे संपवावी असा विचार माझ्या डोक्यात होता. एवढ्या वर्षांच्या मेहनतीने बनवलेल्या या सिनेमॅटिक विश्वाचा शेवट योग्य करण्यासाठी ‘द फायनल चाप्टर’ची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये केवळ आर्थिक कारणांसाठी हा चित्रपट तयार केलेला नाही.

ALSO READ: स्टंटसाठी मिला योवोव्हिचने सोसल्या नरक यातना

या सिरीजमधील आतापर्यंतच्या पाचही चित्रपटांनी चांगला गल्ला जमविलेला असून आता या शेवटच्या चित्रपटाक डूनही तशीच अपेक्षा आहे. आता ती अपेक्षा पूर्ण होणार का हे येत्या ३ फेब्रुवारी रोजी सिनेमा प्रदर्शित झाल्यावर कळेलच.

Web Title: 'Resident Evil' debuts with director Paul Anderson and Milwaukee's love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.