मिशेल किगन केवळ ४५ मिनिटांत होऊ शकते तयार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2017 21:57 IST2017-04-01T16:27:45+5:302017-04-01T21:57:45+5:30

हॉलिवूड अभिनेत्री मिशेल किगन म्हणतेय की, तिला तयार होण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. फक्त दोन गोष्टी अशा आहेत, ज्यामुळे ...

Ready Michel Keegan can only be done in 45 minutes! | मिशेल किगन केवळ ४५ मिनिटांत होऊ शकते तयार!

मिशेल किगन केवळ ४५ मिनिटांत होऊ शकते तयार!

लिवूड अभिनेत्री मिशेल किगन म्हणतेय की, तिला तयार होण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. फक्त दोन गोष्टी अशा आहेत, ज्यामुळे तिला तयार होणे सहज शक्य होते. बॅँग शोबिज या वेबसाइटला दिलेल्या माहितीनुसार किगनने सांगितले की, मी कुठल्याही प्रकारचा नट्टापट्टा न करता काही क्षणातच तयार होऊ शकते. जर माझे डोक्यावरचे केस धुतलेले असतील, तर त्यावर मला फारशी मेहनत घ्यावी लागत नाही. मी केवळ ४५ मिनिटांत तयार होऊ शकते. 



फिमेलफर्स्ट डॉट को डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, मिशेल किगनने सांगितले की, दोन गोष्टींमुळे तिला तयार होण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. जर डोक्यावरचे केस धुतलेले असतील अन् मला कुठला ड्रेस घालायचा आहे हे अगोदरच माहिती असेल तर ४५ मिनिटांतच तयार होऊ शकते. बºयाचदा कपड्यांबाबत मी कन्फ्यूज असते. त्यामुळे शक्य होईल तेव्हा रूममध्ये कपडे बदलत असते. एखादा ड्रेस मी सूट होत असेल तर तो कोणत्या पार्टी किंवा फंक्शनसाठी घालायचा हे मी अगोदरच ठरवित असते. यावेळी मात्र रूममध्ये सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले असते, असेही मिशेलने सांगितले. 

Web Title: Ready Michel Keegan can only be done in 45 minutes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.