प्रियांकाच्या ‘क्वांटिको’ची लोकप्रियता घटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 16:00 IST2016-11-29T16:00:22+5:302016-11-29T16:00:22+5:30
‘देसी गर्ल’ प्रियांका चोपडाचा प्रसिद्ध टीव्ही शो ‘क्वांटिको’ची जादू आता ओसरू लागली आहे. टेलिव्हिजन रेटिंग घसरल्यामुळे येत्या जानेवारी महिन्यापासून ...
.jpg)
प्रियांकाच्या ‘क्वांटिको’ची लोकप्रियता घटली
‘ ेसी गर्ल’ प्रियांका चोपडाचा प्रसिद्ध टीव्ही शो ‘क्वांटिको’ची जादू आता ओसरू लागली आहे. टेलिव्हिजन रेटिंग घसरल्यामुळे येत्या जानेवारी महिन्यापासून ही मालिका रविवारऐवजी सोमवारी टेलिकास्ट होणार आहे. रविवारचा प्राईम टाईम काढून घेणे हा मालिके साठी मोठा धक्का मानला जातो.
‘क्वांटिको’ने प्रियांकाला बिग हॉलीवूड तिकिट मिळवून दिले. अमेरिकेत तिचे नाव करणाऱ्या या मालिकेच्या लोकप्रियतेमुळेच इंटरनॅशल स्टार बनली. गेल्या वर्षी पहिल्या सीझनमध्ये तिच्या जबरदस्त अभिनयामुळे लोकांनी तिला ‘सर्वात लोकप्रिय अभिनेत्री’चा पुरस्कारही मिळवून दिला. त्यामुळे दुसऱ्या सीझनची संपूर्ण जबाबदारी तिच्यावर टाकण्यात आली.
त्यानुसार दुसऱ्या पर्वाच्या सुरुवातीच्या काही एपिसोडस्ना प्रतिसादही चांगला मिळाला; मात्र गेल्या काही भागांपासून प्रेक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. शोची घटती लोकप्रियता पाहता त्यांचा प्राईम टाईम स्लॉट काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार २३ जानेवारीपासून शो सोमवारी रात्री टेलिकास्ट केला जाणार. शोच्या लेखकांनी ट्विट करून ही माहिती दिली.
![]()
क्वांटिको : प्रियांका चोपडा
शोची लाईव्ह व्ह्युवरशिप रेटिंग तीस लाखांपर्यंत खाली उतरली आहे. ‘कनव्हिक्शन’ मालिके च्या जागी आता ‘क्वांटिको’ दाखवली जाणार आहे. मात्र ‘क्वांटिको’ची जागा दुसरा कोणता शो घेणार हे अद्याप निश्चित नाही.