​प्रियांकाचे ‘बॅड अँड स्केरी’ बेवॉच पोस्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2016 14:48 IST2016-11-01T14:46:32+5:302016-11-01T14:48:32+5:30

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने तिच्या मादक अदांचे जलवे दाखवलेले आहेत, आता तिच्या सौंदर्याची डार्क आणि भीतीदायक बाजू समोर आली ...

Priyanka's 'Bad and Scary' lookout poster | ​प्रियांकाचे ‘बॅड अँड स्केरी’ बेवॉच पोस्टर

​प्रियांकाचे ‘बॅड अँड स्केरी’ बेवॉच पोस्टर

ेसी गर्ल’ प्रियांका चोप्राने तिच्या मादक अदांचे जलवे दाखवलेले आहेत, आता तिच्या सौंदर्याची डार्क आणि भीतीदायक बाजू समोर आली आहे. ‘हॅलोविन’निमित्त तिने आगामी बेवॉच चित्रपटाचे एक स्पेशल पोस्टर चाहत्यांशी शेअर केले आहे. या चित्रपटात ती मुख्य खलनायिकेची भूमिका साकारत असून याद्वारे तिचे हॉलीवूड चित्रपटांमध्ये पदार्पण होत आहे.

इन्स्टाग्रामवर पोस्टर शेअर करताना तिने लिहिले की, ‘मी तुमच्यावर नजर ठेवून आहे! हॅपी हॅलोविन. #बूवॉच #बीबॅड’.

पोस्टरवर तिने काळ्या रंगाचा वन-शोल्डर ड्रेस परिधान केलेला असून तिच्या पाठीमागे वटवाघूळाचे (बॅट) पंख आणि डोक्यावर दैत्यासारखे छोटे शिंग दाखवलेले आहेत. ओठांच्या बाजूने ओघळणारे रक्त आणि एका मांडीवर लावलेली बंदूक अशा डेडली लूक्समुळे ती ‘खरतनाक’ व्हिलन वाटतेय.

                                Priyanka Bad


चित्रपटात ती ‘व्हिक्टोरिआ लीडस्’ नावाचे पात्र करीत असून सोबत झॅक अ‍ॅफ्रॉन, ड्वेन जॉन्सन, अ‍ॅलेक्झांड्रा डॅडॅरिओ, केली रोहरबाक अशी तगडी स्टारकास्ट आहे. विशेष म्हणजे खास प्रियांकासाठी खलनायकाचे पात्र बदलण्यात आले. तिने दिग्दर्शक सेठ गॉर्डोनला विनंती करून करून स्क्रीप्टमध्ये बदल करायला लावले आणि मग ‘व्हिक्टर’ नावाच्या पात्राचे पुनर्लेखन करून ते ‘पीसी’साठी व्हिक्टोरिया करण्यात आले.

चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरवर प्रियांकाचा सामावेश करण्यात आला नव्हता; परंतु चार जुलै या अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाँच केलेल्या पोस्टरवर ती झळकली होती. त्यावर तिने कॅप्शन दिले होते की, फायनली...वी आर आॅल इन वन फ्रेम! नो पार्टी लाईक अ बीच पार्टी!’ (अखेर शेवटी आम्ही एका पोस्टरवर एकत्र आलो. समुद्रकिनाऱ्यावरील पार्टीसारखी मौज कशातच नाही,)

                                Priyanka BayWatchd

पुढच्या वर्षी १९ मे रोजी चित्रपट प्रदर्शित होत आहे. हीट टीव्ही सीरिज ‘क्वांटिको’च्या अफाट यशानंतर प्रियांका या चित्रपटातही सर्वांची मने जिंकणार यात काही शंका नाही.

Web Title: Priyanka's 'Bad and Scary' lookout poster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.