‘बेवॉच’च्या नव्या पोस्टरमध्ये प्रियंका चोपडाचा पहा किलर अंदाज!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2017 20:03 IST2017-04-20T14:33:58+5:302017-04-20T20:03:58+5:30

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा ही सध्या तिच्या पहिल्यावहिल्या ‘बेवॉच’ या हॉलिवूडपटाबाबत प्रचंड उत्सुक आहे. सध्या या चित्रपटाचे एक पोस्टर ...

Priyanka Chopra's killer look in the new poster of 'Bevock' !! | ‘बेवॉच’च्या नव्या पोस्टरमध्ये प्रियंका चोपडाचा पहा किलर अंदाज!!

‘बेवॉच’च्या नव्या पोस्टरमध्ये प्रियंका चोपडाचा पहा किलर अंदाज!!

लिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा ही सध्या तिच्या पहिल्यावहिल्या ‘बेवॉच’ या हॉलिवूडपटाबाबत प्रचंड उत्सुक आहे. सध्या या चित्रपटाचे एक पोस्टर रिलीज झाले असून, त्यामध्ये पीसीचा अंदाज खूपच किलर आणि सेक्सी दिसत आहे. 

या चित्रपटात प्रियंका खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चित्रपटात तिची भूमिका खूपच महत्त्वाची समजली जात आहे. दरम्यान, रिलीज झालेल्या पोस्टरकडे बघून असे वाटत आहे की, प्रियंका तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघत आहे. तिने घातलेल्या सन ग्लासेसमध्ये अभिनेता ड्वेन जॉन्सन आणि जॅक एफरॉनसह इतरही काही कास्ट बघावयास मिळत आहेत. 

चित्रपट निर्मात्यांनी हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले असून, त्यास कॅप्शनही दिले आहे. दरम्यान, प्रियंकाच्या भारतीय फॅन्ससाठी हे पोस्टर एखाद्या ट्रीटसारखे आहे. कारण त्यांना पीसीची पहिल्यांदाच अशा अवतारात झलक बघावयास मिळाली आहे. 



चित्रपटात ग्रे शेडमध्ये बघावयास मिळत असलेली प्रियंका सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ती सध्या बºयाचशा अमेरिकन टीव्ही शोमध्ये जात असून, तेथील तिची एंट्री चर्चेचा विषय ठरत आहे. हा चित्रपट २५ मे रोजी रिलीज होणार आहे. 

दरम्यान, रिलीज करण्यात आलेल्या या पोस्टरवरून सध्या वेगळीच चर्चा रंगली आहे. कारण हे पोस्टर केट हडसन हिच्या ‘अलमोस्ट फेमस’ या चित्रपटाच्या पोस्टरशी साम्य साधणारे आहे. कारण या पोस्टरमध्ये अभिनेत्रीच्या गॉगलवर चित्रपटाचे नाव बघावयास मिळाले होते, तर प्रियंका चोपडाच्या या पोस्टरमध्ये पीसीच्या गॉगलमध्ये कास्ट बघावयास मिळत आहे. 

Web Title: Priyanka Chopra's killer look in the new poster of 'Bevock' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.