किमच्या सुरक्षा ताफ्यात पोलीस अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2016 19:32 IST2016-11-05T19:32:36+5:302016-11-05T19:32:36+5:30

रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार किम कर्दशियां हिच्यासोबत झालेल्या लुटमारीच्या घटनेतून किम अजूनही सावरलेली नाही. खासगी सुरक्षेवर कोट्यवधी डॉलरचा खर्च करून ...

Police officers in the security force of Kim | किमच्या सुरक्षा ताफ्यात पोलीस अधिकारी

किमच्या सुरक्षा ताफ्यात पोलीस अधिकारी

अ‍ॅलिटी टीव्ही स्टार किम कर्दशियां हिच्यासोबत झालेल्या लुटमारीच्या घटनेतून किम अजूनही सावरलेली नाही. खासगी सुरक्षेवर कोट्यवधी डॉलरचा खर्च करून देखील किम सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी पोलिसांचा आधार घेत आहे. 
याची प्रचिती नुकतीच आली असून, तिची सावत्र बहीण मॉडेल केंडल जेनर हिच्या बर्थ डे पार्टीत जाण्यासाठी किमने तीन आॅफ ड्युटी पोलीस अधिकाºयांना तिच्या सुरक्षा व्यवस्थेत सहभागी करून घेतले होते. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार गेल्या बुधवारी केंडलने तिच्या २१ व्या वाढदिवसानिमित्त एका पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीत अनेक सेलिब्रिटींना निमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये किमचा समावेश होता. परंतु किमने तिच्या सुरक्षा ताफ्यात पोलीस अधिकाºयांना सहभागी करून घेतले. यासाठी तिने पोलीस अधिकाºयांना एक तासाचे प्रत्येकी शंभर डॉलर इतके मानधन दिले. किमच्या सुरक्षा ताफ्यात पोलिसांना बघून पाटीर्तील इतर सेलिब्रिटीही आवाक झाले होते. 
गेल्या महिन्यात फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे किम हिला काही बंदुकधारी दरोडेखोरांनी लुटले होते. तिच्याकडील कोट्यवधी डॉलरचे दागिने या चोरट्यांनी लंपास केले होते. त्यानंतर किमने तिचा खासगी सुरक्षा रक्षक पास्कल दुवियर याला काढून टाकले होते. त्याचबरोबर कान्ये वेस्ट याने देखील तिच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षारक्षकांचा ताफाच तयार केला होता. मात्र दहशतीत असलेल्या किमने जोपर्यंत पोलीस सुरक्षा ताफ्यात राहत नाहीत, तोपर्यंत बाहेर पडणार नसल्याचा पवित्रा घेतल्यानेच पोलिसांना पाचारण केले गेले होते, असे बोलले जात आहे. 
असो किम आता सुरक्षेबाबत गंभीर असून, तिला कुठल्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही, हेच यावरून दिसून येते. 

Web Title: Police officers in the security force of Kim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.