Oscars 2017: ​लिओनार्दो डिकॅप्रिओसह हे सिलेब्रिटी देणार आॅस्कर पुरस्कार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 18:33 IST2017-02-02T13:03:16+5:302017-02-02T18:33:16+5:30

आॅस्कर पुरस्कारांसाठी आता केवळ एक महिना बाकी आहे. चित्रपटसृष्टीतील सर्वात महत्त्वाचा व मानाचा अवॉर्ड म्हणून आॅस्कर पुरस्कारांची ख्याती आहे. ...

Oscars 2017: Leonardo DiCaprio, a Celebrity Award Oscar ... | Oscars 2017: ​लिओनार्दो डिकॅप्रिओसह हे सिलेब्रिटी देणार आॅस्कर पुरस्कार...

Oscars 2017: ​लिओनार्दो डिकॅप्रिओसह हे सिलेब्रिटी देणार आॅस्कर पुरस्कार...

स्कर पुरस्कारांसाठी आता केवळ एक महिना बाकी आहे. चित्रपटसृष्टीतील सर्वात महत्त्वाचा व मानाचा अवॉर्ड म्हणून आॅस्कर पुरस्कारांची ख्याती आहे. म्हणून तर मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाचे ती गोल्डन बाहुली जिंकण्याचे स्वप्न असते.

यंदाच्या पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांना मागच्या वर्षीचे विजेत पुरस्कार प्रदान करणार आहेत. लिओनार्दो डिकॅप्रिओ, ब्री लार्सन, मार्क रेलॅन्स आणि अ‍ॅलिशिया विकांडर हे गत आॅस्कर विजेते कलाकार यंदा पुरस्कार देणार आहेत.

‘ला ला लँड’ या सिनेमाने सर्वाधिक १४ नामांकने मिळवली असून रायन गोस्लिंग-एम्मा स्टोन स्टारर या सिनेमाची सध्य खूप चर्चा सुरू आहे. त्यासोबतच कुमारवयीन समलैंगिक अश्वेत मुलाच्या भावनाविश्वाचे चित्रण मांडणारा काव्यात्मक चित्रपट ‘मूनलाईट’ बेस्ट पिक्चर आॅस्करचा दावेदार मानला जात आहे.

अनेक वर्षांच्या हुलकावणीनंतर अखेर गेल्या वर्षी डिकॅप्रिओला त्याचा बहुप्रतिक्षीत आॅस्कर पुरस्कार मिळाला. ‘द रेव्हनंट’ चित्रपटातील भूमिकेसाठी तो सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला. त्याआधी तो ‘द वुल्फ आॅफ वॉल स्ट्रीट’, ‘ब्लड डायमंड’, ‘द एव्हिएटर’, ‘व्हाट्स इटिंग गिल्बर्ट ग्रेप’ या सिनेमांसाठी नामांकित झाला होता.

Oscar nominations

‘रुम’ चित्रपटातील असामान्य अभिनयासाठी ब्री लार्सन गेल्या वर्षी ‘सर्वोत्कृष्ट नायिका’ ठरली. त्यासोबतच ती ‘ट्रेनरेक’, ‘शॉर्ट टर्म १२’ अशा सिनेमांतूनही झळकलेली आहे. येणाऱ्या काळात ती ‘कॅप्टन मार्व्हल’, ‘काँग: स्कल आयलँड’, ‘द ग्लास कॅसल’ आणि ‘युनिकॉर्न स्टोर’ या चित्रपटांत दिसणार आहे.

स्टीव्हन स्पीलबर्ग दिग्दर्शित ‘ब्रिज आॅफ स्पाईज’ चित्रपटातील रोलसाठी मार्क  रेलॅन्स उत्कृष्ट सहअभिनेता तर ‘द डॅनिश गर्ल’साठी अ‍ॅलिशिया विकांडर उत्कृष्ट सहअभिनेत्री ठरली होती. रेलॅन्स हे जेष्ठ अभिनेते असून त्यांनी नाटक व सिनेमा अशा दोन्ही माध्यमांमध्ये भरीव कामगीरी केलेली आहे.

गेल्या वर्षी ते ‘द बीएफजी’ सिनेमात दिसले होते. तसेच यंदा त्यांचे ‘डनक र्क’ आणि ‘रेडी प्लेयर वन’ हे चित्रपट रिलीज होत आहेत. ‘ट्वेल्फ्थ नाईट’, ‘येरुशेलम’ आणि ‘बोर्इंग बोर्इंग’ या नाटकांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ‘टोनी अवॉर्ड’ने नावाजण्यात आलेले आहे.

यंदाचा आॅस्कर सोहळा जिमी किम्मेल होस्ट करणार असून २६ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे.

Web Title: Oscars 2017: Leonardo DiCaprio, a Celebrity Award Oscar ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.