Once Upon A Time : किरा नायटलीला स्वत:ची आईच ओळखू शकली नाही!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2017 22:11 IST2017-04-21T16:41:25+5:302017-04-21T22:11:25+5:30

किरा नायटली आणि नॅटली पोर्टमॅन हे दोन्ही नावे हॉलिवूड जगतात मोठे आहेत. या दोघांमध्ये सगळ्यात मोठे साम्य म्हणजे त्यांचा ...

Once Upon A Time: Rent Natalie could not identify her own mother !! | Once Upon A Time : किरा नायटलीला स्वत:ची आईच ओळखू शकली नाही!!

Once Upon A Time : किरा नायटलीला स्वत:ची आईच ओळखू शकली नाही!!

रा नायटली आणि नॅटली पोर्टमॅन हे दोन्ही नावे हॉलिवूड जगतात मोठे आहेत. या दोघांमध्ये सगळ्यात मोठे साम्य म्हणजे त्यांचा चेहरा. कारण दोघेही हुबेहूब एकसारख्याच दिसतात. दोघींचा फोटो जर समोर ठेवला तर त्यातील किरा कोण? आणि नॅटली कोण? हे ओळखणे मुश्किल होईल. एकदा तर या दोघींना त्यांची जन्मदातीच ओळखू शकली नाही. 

१९९९ मध्ये आलेल्या ‘स्टार वॉर्स’ दोघीही एकत्र झळकल्या होत्या. जेव्हा चित्रपटाची शूटिंग सुरू होती, तेव्हा किराची आई नेहमीच सेटवर येत असे. एकदा किराची आई सेटवर आली. त्यावेळी दोघींच्याही मेकअपचे काम पूर्ण झाले होते. त्यामुळे दोघींमध्ये एवढी समानता दिसत होती की, त्यांना ओळखणे मुश्किल झाले होते. 



किरा नायटली आणि नॅटली पोर्टमॅन
मग, त्याचे जे घडणार होते तेच झाले. किराची आई नॅटलीसोबत बोलायला लागली. नॅटलीनेदेखील त्यांच्याशी मुलीसारखाच संवाद साधला. मात्र तिला हे फारकाळ करता आले नाही. तिला लगेचच हसायला आले. तिच्या चेहºयावरील हास्य बघून किराच्या आईला संशय आला. त्यांनी लगेचच किराकडे धाव घेतली.

किराच्या आईचे हे कन्फ्युजन बघून मग सगळ्यानाच हसू फुटले. तेव्हा किराच्या आईने सांगितले होते की, हा दोघींचा फक्त चेहराच मिळता-जुळता नाही तर यांच्या सवयीदेखील सारख्याच आहेत. ज्यामुळे मला त्यांना ओळखणे शक्य झाले नाही. 

Web Title: Once Upon A Time: Rent Natalie could not identify her own mother !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.