...आता शेरिल कोलनेही केले बेबी बंप फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2017 17:59 IST2017-02-24T12:25:29+5:302017-02-24T17:59:28+5:30

हॉलिवूडमध्ये सध्या जणू काही बेबी बंप फोटोशूटचा ट्रेंडच आला आहे. सुरुवातीला बियॉन्से नोल्स त्यानंतर निकी मिनाज अन् आता गायिका ...

... now Sheryl Collar has done baby bump photoshoot | ...आता शेरिल कोलनेही केले बेबी बंप फोटोशूट

...आता शेरिल कोलनेही केले बेबी बंप फोटोशूट

लिवूडमध्ये सध्या जणू काही बेबी बंप फोटोशूटचा ट्रेंडच आला आहे. सुरुवातीला बियॉन्से नोल्स त्यानंतर निकी मिनाज अन् आता गायिका शेरिल कोल हिने बेबी बंप फोटोशूट तिच्या चाहत्यांनी ही गोड न्यूज दिली आहे. लॉरियल ब्रॅण्ड आणि चॅरिटी फाउंडेशन द प्रिंसेस ट्रस्टसाठी तिने हे फोटोशूट केले आहे. 



इआॅनलाइन डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, शेरिल फोटोमध्ये दोन्ही हाथ पोटावर ठेवून उभी आहे. तिने लांब अस्तीनचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला असून, यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. विशेष म्हणजे फोटोशूट केल्यानंतरही ती गर्भवती असल्याची बातमी सांगताना लाजत होती. खरं तर गेल्या काही दिवसांपासून शेरिल ज्यापद्धतीचे कपडे परिधान करीत आहे, त्यावरूनच ती गर्भवती असल्याचा अंदाज लावला जात होता. मात्र याविषयी तिच्याकडून कोणीही अधिकृतरीत्या जाहीर केले नसल्याने तिची ही गोड बातमी प्रकाशझोतात येऊ शकली नाही. मात्र फोटोशूटमुळे शेरिल गर्भवती असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

शेरिल आणि तिचा बॉयफ्रेंड गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात एका कॉन्सर्टदरम्यान एकत्र बघावयास मिळाले होते. तेव्हापासून शेरिल सार्वजनिक ठिकाणी झळकली नव्हती. अखेर चॅरिटीनिमित्त तिने केलेल्या फोटोशूटमुळे तिच्या गायब होण्यामागचे कारण स्पष्ट झाले आहे. गायक पेन याने एक वर्षांपूर्वीच शेरिलला डेट करण्यास सुरुवात केली होती. गेल्या तीन महिन्यांपूर्वीच तिने शेरिलसोबतच्या संबंधाविषयी जाहीरपणे सांगितले होते. 



गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात जेव्हा शेरिलची आई गर्भावस्थेसंदर्भातील काही साहित्य खरेदी करताना बघावयास मिळाली होते तेव्हाच तिच्या गर्भावस्थाविषयी चर्चा रंगली होती. आता शेरिल गर्भवती असून, ती आई होण्यास उत्सुक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: ... now Sheryl Collar has done baby bump photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.