...आता पोर्न स्टारनेही केला ट्रम्पवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2016 16:00 IST2016-10-25T16:00:40+5:302016-10-25T16:00:40+5:30

अमेरिकी राष्टपती पदाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत दिवसागणिक भर पडत आहे. आता एका पोर्न स्टारने त्यांच्यावर ...

... now the porn star also accused Trump | ...आता पोर्न स्टारनेही केला ट्रम्पवर आरोप

...आता पोर्न स्टारनेही केला ट्रम्पवर आरोप

ेरिकी राष्टपती पदाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत दिवसागणिक भर पडत आहे. आता एका पोर्न स्टारने त्यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केल्याने ते पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. या पोर्न स्टारने दहा वर्षांपूर्वी ट्रम्प यांनी माझ्याशी गैरव्यवहार केला होता, असा खळबळजनक खुलासा केला आहे. 
पोर्न स्टार जेसिका ड्रेक हिने एक पोस्ट शेअर करून म्हटले की, ट्रम्प यांनी मला आणि माझ्यासोबतचे अन्य दोन महिलांना मिठीत जखडून ठेवले होते अन् आमच्या परवानगीविना ते आम्हाला किस करत होते. यामुळे आम्ही तिघीही प्रचंड घाबरलो होतो. आम्ही त्यांना विरोध केला, परंतु त्यांनी आम्हाला सोडले नव्हते. यावेळी जेसिकाने ट्रम्पसोबतचा गोल्फ टूर्नामेंट वेळीचा एक फोटोही शेअर केला.  ट्रम्पवर असा आरोप करणारी जेसिका ही अकरावी महिला ठरली आहे. ‘द गार्डियन’ या साप्ताहिकाने दिलेल्या माहितीनुसार ट्रम्पने जेसिकाला त्यांच्यासोबत एका पार्टीत जाण्यासाठी दहा हजार डॉलर आणि त्यांच्या खासगी विमानाचा वापर करण्याची आॅफर दिली होती.
मात्र ट्रम्पकडून या आरोपांना तथ्यहीन म्हटले आहे. हे वास्तव नसून काल्पनिक कथा सांगितले जात असल्याचाही खुलासा ट्रम्प यांच्या वतीने करण्यात आला आहे. ट्रम्प हे कधीही जेसिका नावाच्या महिलेला भेटले नाही. त्यामुळे तिचा लंैगिक छळ करण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही. जेसिका नावाच्या महिलेशी जाणून घेण्याची त्यांची अजिबात इच्छा नसल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी हे हिलेरी क्लिंटन यांचा षडयंत्र असल्याचाही आरोप ट्रम्प यांच्या वतीने करण्यात आला आहे. मात्र जेसिकाच्या या आरोपांमुळे ट्रम्प हे पुन्हा एकदा अडचणीत आले हे निश्चित.

Web Title: ... now the porn star also accused Trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.