उत्तर अमेरिकेत ‘द अकाऊंटेंट’ सुपरहिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2016 15:28 IST2016-10-18T15:28:09+5:302016-10-18T15:28:09+5:30

वॉर्नर ब्रदर्सचा थ्रिलर सिनेमा ‘द अकाऊटेंट’ने या आठवड्यातील केविन हार्टच्या कॉमेडी चित्रपटाला धोबीपछाड देत उत्तर अमेरिकेच्या बॉक्स आॅफिसवर अव्वल ...

North American 'The Accountant' superhit | उत्तर अमेरिकेत ‘द अकाऊंटेंट’ सुपरहिट

उत्तर अमेरिकेत ‘द अकाऊंटेंट’ सुपरहिट

र्नर ब्रदर्सचा थ्रिलर सिनेमा ‘द अकाऊटेंट’ने या आठवड्यातील केविन हार्टच्या कॉमेडी चित्रपटाला धोबीपछाड देत उत्तर अमेरिकेच्या बॉक्स आॅफिसवर अव्वल स्थान मिळवले. 
कॉमस्कोरने गेल्या रविवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार अभिनेता बेन एफ्लेक, एना केंड्रिक आणि जे. के. सिमोन्स यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने ३,३३२ थिएटर्समध्ये तब्बल २.४७ कोटी डॉलर्सचा गल्ला जमविला. चित्रपटाने कमाईच्या बाबतीत सुरवातीच्या आठवड्यात उत्तर अमेरिकेतील बॉक्स आॅफिसवर अव्वल स्थान मिळवले. या चित्रपट बघणाºयामध्ये ५८ टक्के पुरुष तर ४२ टक्के महिला आहेत. हा चित्रपट तरुणांना अधिक आकर्षित करीत असल्याचे या आकडेवारीनुसार स्पष्ट होते.  

Web Title: North American 'The Accountant' superhit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.