बियॉन्सेनंतर निकी मिनाजनेही शेअर केले बेबी बंप दाखविणारे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2017 17:14 IST2017-02-22T11:40:32+5:302017-02-22T17:14:18+5:30

अमेरिकन गायिका बियॉन्से नोल्स हिने नुकतेच बेबी बंप दाखविणारे फोटो सोशल मीडियावर अपलोड करून धूम उडवून दिली होती. या ...

Nike Minaj shared photos of baby bumps after Beyoncé | बियॉन्सेनंतर निकी मिनाजनेही शेअर केले बेबी बंप दाखविणारे फोटो

बियॉन्सेनंतर निकी मिनाजनेही शेअर केले बेबी बंप दाखविणारे फोटो

ेरिकन गायिका बियॉन्से नोल्स हिने नुकतेच बेबी बंप दाखविणारे फोटो सोशल मीडियावर अपलोड करून धूम उडवून दिली होती. या फोटोंमुळे बियॉन्से गर्भवती असल्याची वार्ता जगभर पोहचली होती. आता बियॉन्सेच्या पाठोपाठ गायिका निकी मिनाज हिनेही बेबी बंप दाखविणारे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून धूम उडवून दिली आहे. 



निकी मिनाज रॅपर आणि गायिका असून, तिने बरेचसे सुपरहिट गाणी गायली आहेत. बियॉन्से आणि निकी अतिशय क्लोज फ्रेंड असून, दोघीही गर्भवती आहेत. आपल्या क्लोज फ्रेंडने बेबी बंप दाखविणारे फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्याने निकीनेही अशाच प्रकारचे फोटो शेअर करून गर्भवती असल्याचे जाहीर केले आहे. या फोटो कॅप्शनमध्ये निकीने, ‘मी ही गोड बातमी तुमच्यापर्यंत पोहचविण्यास आतुर झाली होती, परंतु?’ असे लिहिले आहे. 

निकीच्या या परंतुमुळे फोटोवर आता संशय घेतला जात आहे. कारण हा फोटो निकीचा आहे की नाही? यास अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचा अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. परंतु काहीही असो सध्या निकी बियॉन्सेप्रमाणेच प्रकाशझोतात असून, सोशल मीडियावर चर्चेत आहे. कारण तिचे फॅन्स निकीचा बेबी बंप फोटो मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत. 



बियॉन्सेने काही दिवसांपूर्वी बेबी बंप दाखविणे फोटो शेअर करून लवकरच जुळ्या मुलांना जन्म देणार असल्याचे सांगितले होते. आता निकीनेही असे फोटो शेअर केल्याने तिच्या फॅन्सला ही गोड बातमी कळाली आहे. परंतु निकी जुळ्या मुलांना जन्म देणार नाही, हेही तेवढेच खरे आहे. 

Web Title: Nike Minaj shared photos of baby bumps after Beyoncé

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.