नवऱ्याच्या या ‘सवयी’मुळे निकोल किडमन होते चिंताग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 16:46 IST2017-01-06T16:46:35+5:302017-01-06T16:46:35+5:30

हॉलीवूड अभिनेत्री निकोल किडमन फार संवेदनशील आहे. म्हणून तर जेव्हा तिचा नवरा किथ अर्बन तिचा फोन उचलत नाही तेव्हा ...

Nicole Kidman was anxious because of this husband's 'habit' | नवऱ्याच्या या ‘सवयी’मुळे निकोल किडमन होते चिंताग्रस्त

नवऱ्याच्या या ‘सवयी’मुळे निकोल किडमन होते चिंताग्रस्त

लीवूड अभिनेत्री निकोल किडमन फार संवेदनशील आहे. म्हणून तर जेव्हा तिचा नवरा किथ अर्बन तिचा फोन उचलत नाही तेव्हा ती फारच चिंताग्रस्त होते. तो जोपर्यंत फोन रिसिव्ह करत नाही तोपर्यंत ती त्याला कॉलवर कॉल करीत राहते.

नुकतेच तिने एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला की, किथ जेव्हा माझा फोन उचलत नाही तेव्हा मला खूप भीती वाटू लागते. मनात नको ते विचार घोळू लागतात. म्हणून मग चिंतित होऊन खात्री करण्यासाठी कॉल करीत राहते. मला मान्य आहे की, माझे असे वागणे जरा टोकाचे आणि अव्यवहार्य आहे; पण आता तो माझा स्वभावच असल्यामुळे काय करणार?

फोन न उचलण्याची तिच्या नवऱ्याची सवय जरी तिला खूप त्रासदायक वाटत असली तरी त्याच्यावर ती जास्त काळ नाराज नाही राहू शकत. कारण तिचा ४० वा वाढदिवस त्याने अत्यंत वेगळ्या पद्धतीने साजरा करून तिला खूश केले होते.

तिने सांगितले की, ‘त्याने मला ४० व्या वाढदिवसाच्या दिवशी आॅस्ट्रेलियातील एका छोट्या टेकडीवर नेले आणि तेथे मग केवळ आम्ही दोघेच बसलो. मग खास माझ्यासाठी त्याने आयोजित केलेला फटाक्यांचा शो पाहत माझा बर्थडे साजरा केला. किती सेक्सी आणि रोमॅण्टिक आहे तो!

Nicole and Keith
रोमॅण्टिक कपल : किथ अर्बन आणि निकोल किडमन किथ अर्बन आणि निकोल किडमन

तिने त्यांचा पहिला किस कसा झाला याबाबतही सांगितले. ‘द शायनिंग’ नावाचा हॉरर चित्रपट पाहताना तिने व किथने प्रथम किस केला होता. ती म्हणाली की, ‘अगदी हायस्कुलमध्ये असल्यासारखे वाटत होते. आणि हो आम्ही केवळ किसच नाही केले. अजुनही बरेच काही केले.’

किथ हा निकोलचा दुसरा नवरा असून यापूर्वी तिने टॉम क्रुझसोबत लग्न केले होते. पहिल्या लग्नापासून तिला इझाबेला (२४) व कॉनर (२१) ही दोन मुले तर किथसोबत संडे (८) आणि फेथ (६) या दोन मुली आहेत.

मध्यंतरी त्यांच्या भांडणांच्या बातम्या आल्या होत्या. करिअरमधील व्यस्ततेमुळे ते कुटुंबाला आणि एकमेकांना वेळ देऊ शकत नसल्यामुळे ते सतत भांडायचे. परंतु सध्या त्यांच्या नात्यामध्ये स्थैर्य असल्याचे तिने सांगितले.

Web Title: Nicole Kidman was anxious because of this husband's 'habit'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.