‘जुमांजी’च्या सीक्वलचे नाव घोषित; तुम्हीही जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2017 15:55 IST2017-03-31T10:19:50+5:302017-03-31T15:55:40+5:30

‘जुमांजी’ या प्रसिद्ध हॉलिवूडपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. परंतु या सीक्वलचे नाव काय असेल हा प्रत्येकासाठी एकप्रकारचा प्रश्न ...

The name of 'Jumanji' sequel declared; You Know too! | ‘जुमांजी’च्या सीक्वलचे नाव घोषित; तुम्हीही जाणून घ्या!

‘जुमांजी’च्या सीक्वलचे नाव घोषित; तुम्हीही जाणून घ्या!

ुमांजी’ या प्रसिद्ध हॉलिवूडपटाचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. परंतु या सीक्वलचे नाव काय असेल हा प्रत्येकासाठी एकप्रकारचा प्रश्न होता. मात्र आता या प्रश्नाची उकल झाली असून, ‘जुमांजी’च्या सीक्वलचे नाव ‘जुमांजी : वेलकम टू द जंगल’ असे असणार आहे. याबाबतची अधिकृतरीत्या घोषणा करण्यात आली आहे. 

सोनीच्या सिनेमाकोन प्रजेंटेशनच्या उपस्थितीत प्रेक्षकांना चित्रपटाची क्लिप दाखविण्यात आली. यावेळी चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले ड्वेन जॉनसन, करेन गिल्लन, निक जोनास आणि जॅक ब्लॅक उपस्थित होते. हॉलिवूड रिपोर्टर डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, दाखविण्यात आलेल्या क्लिपमध्ये चार शालेय विद्यार्थ्यांना तळघराची सापसफाई करण्याचे आदेश दिले जातात. ज्याठिकाणी त्यांना ‘जुमांजी’सारखाच एक व्हिडिओ गेम मिळतो. 



पुढे हे विद्यार्थी तो गेम खेळण्याचा विचार करतात. गेममधील जे पात्र त्यांच्याकडून निवडले जाते, तसेच वातावरण निर्माण होते. बघता बघता हे सर्व विद्यार्थी जंगलात पोहचतात. तेथूनच चित्रपटाचा थरार सुरू होतो. पहिल्या भागापेक्षा अधिक भयंकर अशा घटना दाखविण्याचा निर्मात्याने प्रयत्न केल्याने प्रेक्षकांच्या अंगावर शहारे उभे राहतील यात शंका नाही. 

‘जुमांजी’चा पहिला भाग १९९६ मध्ये रिलीज करण्यात आला होता. ज्याचे दिग्दर्शन जो जॉनस्टन यांनी केले होते. एका व्हिडिओ गेमभोवती फिरणाºया या चित्रपटात अनेक रोमांचक अशा घटना दाखविण्यात आल्या होत्या. या घटना मनात धडकी भरविणाºया असल्याने या चित्रपटाला प्रेक्षकांची जबरदस्त पसंती मिळाली होती. आता त्याच्या सीक्वलमध्येही अशाच प्रकारचा थरार दाखविला जाण्याची प्रेक्षकांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

Web Title: The name of 'Jumanji' sequel declared; You Know too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.