मिशा बार्टन म्हणतेय सेक्स व्हिडीओ लिक करणे म्हणजे ब्लॅकमेलिंग करणे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2017 22:26 IST2017-04-01T16:56:39+5:302017-04-01T22:26:39+5:30

अभिनेत्री मिशा बार्टन हिचा तिच्या एक्स बॉयफ्रेण्डसोबतच्या खासगी क्षणांचा एक सेक्स व्हिडीओ पोर्न साइटवर लिक केल्याबद्दल मिशाने यास भावनात्मक ...

Mishya Barton says sex video is blackmailing! | मिशा बार्टन म्हणतेय सेक्स व्हिडीओ लिक करणे म्हणजे ब्लॅकमेलिंग करणे!

मिशा बार्टन म्हणतेय सेक्स व्हिडीओ लिक करणे म्हणजे ब्लॅकमेलिंग करणे!

िनेत्री मिशा बार्टन हिचा तिच्या एक्स बॉयफ्रेण्डसोबतच्या खासगी क्षणांचा एक सेक्स व्हिडीओ पोर्न साइटवर लिक केल्याबद्दल मिशाने यास भावनात्मक ब्लॅकमेलिंग असे म्हटले आहे. डेलीमेल डॉट कॉ डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, ३१ वर्षीय मिशाने टीव्ही शो ‘डॉक्टर फिल’शी बोलताना म्हटले की, हा व्हिडीओ सर्वाधिक बोली लावणाºया पोर्न साइटला विकण्यात आला आहे. 

मिशाने सांगितले की, मला या सेक्स टेपविषयी सहा महिन्यांपूर्वीच कोणीतरी सांगितले होते. हे एकूण मला धक्काच बसला होता. कारण भररस्त्यात एक व्यक्ती माझ्याजवळ आला अन् त्याने मला म्हटले की, तुला मला काहीतरी सांगायचे आहे. त्याने जेव्हा हा संपूर्ण प्रकार सांगितला तेव्हा मला विश्वासच बसला नाही. कारण मी त्या व्यक्तीवर मनापासून प्रेम केले होते. माझ्याबाबतीत असे काही घडू शकेल याचा मी स्वप्नातही विचार केलेला नव्हता. मला जेव्हा याविषयी सांगण्यात आले तेव्हा मी स्वत:चीच समजूत काढत होती. कारण तेव्हाही मला असे होऊच शकत नाही, असे वाटत होते. 



मिशाचा हा सेक्स व्हिडीओ वेगवेगळ्या साइटवर अपलोड करण्यात आला असून, सुरुवातीला ५,००,००० डॉलर एवढ्या किमतीत विकला जात होता. याविषयी मिशाने सांगितले की, हा प्रकार पूर्णत: भावनात्मक ब्लॅकमेलिंग आहे. मात्र यातून मी बरेच काही शिकले असून, अशा लोकांपासून चार हात लांब राहण्याचा एकप्रकारचा धडाच मिळाला आहे. माझ्याबाबतीत घडलेली घटना कधीही विसरण्यासारखी नाही. परंतु हे वास्तव स्वीकारून मी पुढे जाण्याचे ठरविले, असेही मिशाने सांगितले. 

Web Title: Mishya Barton says sex video is blackmailing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.