मिरांडा नव्या वर्षात अडकणार विवाहबंधनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2016 19:31 IST2016-10-23T19:31:16+5:302016-10-23T19:31:16+5:30

सुपरमॉडल मिरांडा केर आणि स्नॅपचॅटचे संस्थापक इवान स्पीगेल पुढच्या वर्षी विवाह बंधनात अडकणार आहेत. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार पहिला ...

Miranda gets married in new year | मिरांडा नव्या वर्षात अडकणार विवाहबंधनात

मिरांडा नव्या वर्षात अडकणार विवाहबंधनात

परमॉडल मिरांडा केर आणि स्नॅपचॅटचे संस्थापक इवान स्पीगेल पुढच्या वर्षी विवाह बंधनात अडकणार आहेत. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार पहिला पती ओरलॅँडो ब्लूम याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर मिरांडाने तब्बल एक वर्ष इवान यांच्याशी डेटिंग केले आणि नंतर लग्नाचा विचार केला. मिरांडाला पहिल्या पतीपासून पाच वर्षाचा फ्लिन नावाचा मुलगा आहे. 
गेल्या जून महिन्यातच दोघांनी साखरपुडा उरकल्याने ते लग्न केव्हा करणार याबाबतची चर्चा रंगली होती. याबाबत जेव्हा मिरांडाला विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, आमची लग्नाची तयारी सुरुवातीपासूनच सुरू आहे. आम्ही फक्त नव्या वर्षाची वाट पाहत आहोत. स्पीगेलविषयी बोलताना ती म्हणाली,  तो माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवणार हे मला अजिबात अपेक्षित नव्हते. जेव्हा त्याने लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता. 
स्पीगेलने मला म्हटले होते की, मिरांडा मी तुला पहिली अन् शेवटची मागणी घालणार आहे. त्याचे शब्द ऐकून मी खूप घाबरून गेले होते. मन सुन्न झाले होते. जेव्हा त्याने माझ्याशी लग्न करणार का? असे विचारले तेव्हा मी आनंदाने त्याला मिठी मारली. आता आम्ही दोघेही नव्या वर्षाची वाट पाहत आहोत, असे सांगितले. मात्र नव्या वर्षामधील तारीख कुठली असेल हे सांगणे मात्र तिने टाळले. असो मिरांडा पुन्हा एकदा विवाहाच्या बंधनात अडकणार असल्याने तिचे फॅन्स सुखावतील यात काही दुमत नाही. 

Web Title: Miranda gets married in new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.