मिलाने लिंगभेदी दिग्दर्शकाला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2016 18:46 IST2016-11-04T18:45:34+5:302016-11-04T18:46:13+5:30

अभिनेत्री मिला कुनिस हिने एका लिंगभेदी दिग्दर्शकाला नाव न घेता चांगलेच फटकारले आहे. या दिग्दर्शकाने मिला कुनिस हिला ‘जर ...

Milking victim of gender discrimination | मिलाने लिंगभेदी दिग्दर्शकाला फटकारले

मिलाने लिंगभेदी दिग्दर्शकाला फटकारले

िनेत्री मिला कुनिस हिने एका लिंगभेदी दिग्दर्शकाला नाव न घेता चांगलेच फटकारले आहे. या दिग्दर्शकाने मिला कुनिस हिला ‘जर अंगप्रदर्शन केले नाही तर तुझे करिअर संपवून टाकेन’ अशी धमकी दिली होती. 
एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार ‘ज्युपिटर एसकेंडिंग’ची अभिनेत्री मिलाने या दिग्दर्शकावर एका पाठोपाठ अनेक आरोप केले. ती म्हणाली की, या दिग्दर्शकाने तिला कॅमेºयासमोर अंगप्रदर्शन करायला सांगितले होते. मात्र नकार दिल्याने त्याने करिअर संपविणार असल्याची धमकी दिली. वास्तविक एका साप्ताहिकाच्या फोटोशूटसाठी तिचे न्यूड फोटोशूट करण्यासाठी हा दिग्दर्शक प्रयत्नशील होता. 
मिलाने एप्लस डॉट कॉमला सांगितले की, जेव्हा दिग्दर्शकाने मला कपडे काढून फोटोशूट कर अन्यथा तुला या शहरात राहू देणार नाही, अशी धमकी दिली तेव्हा मी अवाक झाले. हा दिग्दर्शक जणू काही मला एखाद्या वस्तूप्रमाणे समजत होता. त्याची धमकी मला संताप देणारी होती. मी त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला. याचा अर्थ माझे करिअर संपले का? तर नाही. मी स्वत:ला सिद्ध केले. विशेष म्हणजे मला आजही चांगल्या चित्रपटांच्या आॅफर मिळत आहेत. त्यातून मला चांगले पैसेही मिळत आहेत. याच शहरात मी काम करीत असून, लिंगभेदी दिग्दर्शक माझ्यापासून दूर आहे. ३३ वर्षीय मिलाने सांगितले की, भविष्यात देखील मी अशा प्रसंगाना विरोध करणार आहे. कोणी जर चुकीचे पद्धतीने माझा वापर करू इच्छित असेल, तर त्याला मी धडा शिकविल्याशिवाय शांत बसणार नाही. अशा लिंगभेदी दिग्दर्शकांना इतर अभिनेत्रींनी देखील बळी पडू नये, असे आवाहनही मिलाने केले. 

Web Title: Milking victim of gender discrimination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.