#MeToo : प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा; निर्मात्याने मला अर्धनग्न होण्यास सांगितले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2018 14:00 IST2018-03-17T08:30:12+5:302018-03-17T14:00:12+5:30

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लोपेजने तिच्याशी झालेल्या सेक्शुअल हरासमेंटबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. जेनिफरच्या या खुलाशानंतर पुन्हा एकदा हॉलिवूड ...

#MeToo: The famous actress reveals; The creator told me to be crazy! | #MeToo : प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा; निर्मात्याने मला अर्धनग्न होण्यास सांगितले!

#MeToo : प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा; निर्मात्याने मला अर्धनग्न होण्यास सांगितले!

रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लोपेजने तिच्याशी झालेल्या सेक्शुअल हरासमेंटबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. जेनिफरच्या या खुलाशानंतर पुन्हा एकदा हॉलिवूड निर्माता हार्वे विइंस्टीन वादाला हवा मिळाली आहे. अभिनेत्री आणि गायिका असलेल्या जेनिफर लोपेजने एका मुलाखतीत सांगितले की, आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय वाईट अनुभवांचा सामना करावा लागला. हार्पर्स बाजार मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत जेनिफर लोपेजने म्हटले की, या इंडस्ट्रीमध्ये ज्याच्याकडे ताकद आहे, तो समोरच्या व्यक्तीचा फायदा घेण्याचा हमखास प्रयत्न करतो. जेनिफरने आपल्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करताना म्हटले की, ‘जेव्हा मी माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला पहिल्यांदा भेटली तेव्हा त्याने मला अर्धनग्न होण्यास सांगितले. मात्र मी त्यास स्पष्ट शब्दात नकार दिला होता. 

पुढे बोलताना जेनिफरने सांगितले की, हा माझ्यासाठी खूपच घाबरविणारा अनुभव होता. कारण पहिल्याच भेटीत माझ्याशी असे काही घडले होते, ज्यामुळे मी प्रचंड घाबरली होती. शिवाय हे सर्व मी कोणाला सांगू शकत नव्हती. जेव्हा मी याविषयी बोलण्याचे धाडस केले तेव्हा माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. ही घटना माझ्या सुरुवातीच्या चित्रपटांपैकी एक होती. तेव्हा माझ्या डोक्यात एकच विचार येत होता, तो म्हणजे लोकांचा हा व्यवहार योग्य नाही. त्यामुळे मी दुसºया क्षेत्रात करिअर करण्याचा विचार केला. 

दरम्यान, गेल्यावर्षी हॉलिवूडच्या बºयाचशा अभिनेत्रींनी निर्माता हार्वे विइंस्टिनविरोधात लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांनंतर सोशल मीडियावर #MeToo या नावाने कॅम्पेनही चालविले. या कॅम्पेनअंतर्गत जगभरातील महिलांनी त्यांच्यासोबत घडलेल्या लैंगिक शोषणाच्या घटनांविरोधात आवाज उठविला. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आवाज उठविला होता. #MeToo या कॅम्पेनचे भारतातही पडसाद उमटताना दिसले. 

Web Title: #MeToo: The famous actress reveals; The creator told me to be crazy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.