मेरिल स्ट्रीपने ट्रम्प यांना सुनावले; बॉलिवूडमधून आल्या प्रतिक्रिया...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 17:08 IST2017-01-10T16:24:23+5:302017-01-10T17:08:28+5:30

अमेरिकेच्या ब्रेवर्ली हिल्स येथे पार पडलेल्या ७४व्या गोल्डन ग्लोब अवॉर्डमध्ये लोक त्यावेळी स्तब्ध झाले जेव्हा हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अन् तीन वेळा आॅस्कर विजेती मेरिल स्ट्रीप हिने आपल्या भाषणात अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कडाडून टीका केली. मेरिलचे हे भाषण जेव्हा व्हायरल झाले तेव्हा हॉलिवूडबरोबरच बॉलिवूडनेही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

Merrill Streep told Trump; Reactions from Bollywood ... | मेरिल स्ट्रीपने ट्रम्प यांना सुनावले; बॉलिवूडमधून आल्या प्रतिक्रिया...

मेरिल स्ट्रीपने ट्रम्प यांना सुनावले; बॉलिवूडमधून आल्या प्रतिक्रिया...

ेरिकेच्या ब्रेवर्ली हिल्स येथे पार पडलेल्या ७४व्या गोल्डन ग्लोब अवॉर्डमध्ये लोक त्यावेळी स्तब्ध झाले जेव्हा हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अन् तीन वेळा आॅस्कर विजेती मेरिल स्ट्रीप हिने आपल्या भाषणात अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कडाडून टीका केली. मेरिलचे हे भाषण जेव्हा व्हायरल झाले तेव्हा हॉलिवूडबरोबरच बॉलिवूडनेही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. 
गेल्या सोमवारी पार पडलेल्या या सोहळ्यात मेरिल स्ट्रीपला लाइफ टाइम अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. जेव्हा मेरिलला विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केले गेले तेव्हा तिने आपल्या प्रखर भाषणात ट्रम्प यांचा चांगलाच समाचार घेतला. तिचे भाषण सुरू होते तेव्हा सर्व सभागृह स्तब्ध होते. तिच्या भाषणाला सर्व उपस्थित दाद देत होते. जेव्हा तिचे हे भाषण व्हायरल झाले तेव्हा मात्र हॉलिवूडबरोबरच बॉलिवूडकरांनीही मेरिल स्ट्रीपचे तोंडभरून कौतुक केले.  

At tonight's #GoldenGlobes we honor Hollywood legend Meryl Streep with the prestigious Cecil B. Demille Award. pic.twitter.com/dxpeCDNXY6— Golden Globe Awards (@goldenglobes) January 9, 2017}}}} ">http://

}}}} ">At tonight's #GoldenGlobes we honor Hollywood legend Meryl Streep with the prestigious Cecil B. Demille Award. pic.twitter.com/dxpeCDNXY6— Golden Globe Awards (@goldenglobes) January 9, 2017
मेरिलने भाषणाच्या सुरुवातीलाच म्हटले की, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मी माझा आवाज आणि बुद्धिमत्ता गमावून बसली आहे. त्यामुळेच मला चिठ्ठी वाचून भाषण करावे लागत आहे. हे सर्व गमावून बसण्यामागे काही घडामोडी घडल्या आहेत. अर्थातच यामागे अमेरिकेचे सर्वाधिक सन्मानित व्यक्ती डोनाल्ड ट्रम्प हे आहेत. कारण यावर्षी जो सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स राहिला आहे, तो कोण्या अ‍ॅक्टर किंवा अ‍ॅक्ट्रेसचा नसून ट्रम्प यांनी दिला आहे. त्यांनी न्यू यॉर्क टाइम्सचे अपंग पत्रकार सर्ज कोवलेस्की यांची खिल्ली उडवून प्रेक्षकांना लोटपोट केले आहे. तो क्षण असा होता की, आपल्या देशाचा सर्वाधिक सन्मानित व्यक्ती अशा एका अपंग पत्रकाराची टर्रर्र उडवित आहे, ज्याची त्यांना पलटून उत्तर देण्याची क्षमता नाही. जेव्हा हा सर्व प्रकार माझ्या बघण्यात आला तेव्हा माझे मन पूर्णत: तुटले. कारण एक शक्तिशाली व्यक्ती जेव्हा एका दुर्बल व्यक्तीचा पराभव करून त्याचे सेलिब्रेशन करीत असेल तर ते फारच वाइट असते. माझे सर्व माध्यम प्रतिनिधींना आवाहन आहे की, त्यांनी ट्रम्पच्या विरोधात एकजूट होऊन उभे राहायला हवे. 


न्यूयॉक टाइम्सचे पत्रकार सर्ज कोवलेस्की यांची खिल्ली उडविणाºया डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर माध्यम जगतातून तिव्र प्रतिक्रिया उमटल्या. सीएनएन या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेले वृत्त... 
ट्रम्पने हॉलिवूडमधील काही स्टार्सला दिलेल्या धमकीचाही मेरिलने चांगलाच समाचार घेतला. ती म्हणाली की, हॉलिवूड काय आहे आणि आपण सगळे कोण आहोत? हॉलिवूड असे ठिकाण आहे, जिथे बाहेरील लोकांची संख्या सर्वाधिक आहे. मी न्यू जर्सी येथे लहानाची मोठी झाली. इतर कलाकारही बाहेरून आले आहेत. त्यामुळे हॉलिवूड हे विदेशी लोकांनी भरलेले आहे. मेरिल स्ट्रीपने पुढे म्हटले की, या सगळ्यांचे बर्थ सर्टिफिकेट्स कुठे आहेत? जर तुम्ही आम्हाला बाहेर काढणार असाल तर तुमच्याकडे फुटबॉल आणि मिक्स्ड मार्शल आर्ट व्यतिरिक्त दाखविण्यासारखे दुसरे काहीच नसेल. शिवाय या दोन्ही प्रकाराचा कला क्षेत्राशी काहीही संबंध नाही. त्यामुळे तुमचा आमच्याप्रती असलेला द्वेष काहीच साध्य करू शकणार नाही. 
मेरिलने आपल्या संपूर्ण भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांना लक्ष्य केल्याने, तिचे सर्वच स्तरातून कौतुक झाले. तिने केलेले धाडस बॉलिवूडकरांनाही आवडल्याने त्यांनी लगेचच तिच्या भाषणांवर प्रतिक्रिया दिल्या. 

Quoting my favourite #MerylStreep from last night. When u have a broken heart...turn it into art. You are astounding! #fangirlpic.twitter.com/gPmoprWLLg— PRIYANKA (@priyankachopra) January 9, 2017}}}} ">http://

}}}} ">Quoting my favourite #MerylStreep from last night. When u have a broken heart...turn it into art. You are astounding! #fangirlpic.twitter.com/gPmoprWLLg— PRIYANKA (@priyankachopra) January 9, 2017
अभिनेत्री प्रियंका चोपडा हिने मेरिलसोबतचा एक फोटो शेअर करीत तिचे भाषण आउटस्टॅडिंग असल्याचे म्हटले. यावेळी प्रियंकाने मेरिलला तिच्या भाषणाचा आधार घेत एक सल्लाही दिला. ती म्हणाली की, ‘तुझ्या तुटलेल्या मनाला कलेचे रूप दे’

pic.twitter.com/vB4YFAdWhK— Anushka Sharma (@AnushkaSharma) January 9, 2017}}}} ">http://


अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने तर मेरिलच्या भाषणावर एक भलेमोठे पत्रच लिहले. तिने मेरिलचे कौतुक करताना म्हटले की, ‘एका आर्टिस्टला उदारमतवादी असणे गरजेचे असते.’

We in our film industry don't even need to give a speech like Meryl Streep if we just start standing up with those who actually speak up.— Anurag Kashyap (@anuragkashyap72) January 9, 2017}}}} ">http://

}}}} ">We in our film industry don't even need to give a speech like Meryl Streep if we just start standing up with those who actually speak up.

We in our film industry don't even need to give a speech like Meryl Streep if we just start standing up with those who actually speak up.— Anurag Kashyap (@anuragkashyap72) January 9, 2017}}}} ">— Anurag Kashyap (@anuragkashyap72) January 9, 2017
दिग्दर्शक अनुराग कश्यपने यांनी, मेरिलने दिलेल्या भाषण आपण देण्याची गरज असल्याचे म्हटले. आपण अशा लोकांबरोबर उभे राहायला हवे जे परखडपणे त्यांचे मत व्यक्त करतात. 

More reason to love #MerylStreep. 'Active empathy' is a choice that few make. #Respecthttps://t.co/NavfZYcUzv— Dia Mirza (@deespeak) January 9, 2017}}}} ">http://

}}}} ">More reason to love #MerylStreep. 'Active empathy' is a choice that few make. #Respecthttps://t.co/NavfZYcUzv— Dia Mirza (@deespeak) January 9, 2017
दिया मिर्झा हिने ट्विटच्या माध्यमातून म्हटले की, मेरिल स्ट्रीपला पसंत करण्याचे आणखी एक कारण म्हणजे ती नेहमीच सहानुभूतीची भावना ठेवणारी अभिनेत्री आहे.  

Let's copy their grace,their guts, not their films. #Merylstreep the real true hero, the star. #GoldenGlobeshttps://t.co/akiyIDjeYP— Gauri Shinde (@gauris) January 9, 2017}}}} ">http://

}}}} ">Let's copy their grace,their guts, not their films. #Merylstreep the real true hero, the star. #GoldenGlobeshttps://t.co/akiyIDjeYP— Gauri Shinde (@gauris) January 9, 2017
गौरी शिंदेने म्हटले की, आपल्याला तिचे सिनेमा नव्हे तर तिच्या हिमतीची नकल करायला हवी. मेरिल स्ट्रीप हीच खरी नायिका आहे. स्टार्स, गोल्डन ग्लोब्स. 

Web Title: Merrill Streep told Trump; Reactions from Bollywood ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.